नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था संपूर्ण पणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी जागा उरली नाही. कामानिमित्त स्टेशन परिसरासह छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, बैल बाजार परिसरात येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगच्या सुविधा नसल्याने नागरिकांना दुचाकी रस्त्यावर पार्क करून खरेदीला जावं लागत आहे. तसेच शाळा, हॉस्पिटल या परिसरात असल्याने पार्किंगची सुविधा नाही. या ठिकाणावरून देखील वाहतूक पोलिस गाड्या टोइंग करून घेऊन जातात आणि नागरिकांना मोठा दंड भरावा लागतो. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.त्यामुळे स्टेशन परिसरात पार्किंगची व्यवस्था होईपर्यंत टोइंग व्हॅन बंद करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाने वाहतूक पोलिसांसह केडीएमसीला निवेदन दिले आहे. आधीच या परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. टोइंग व्हॅन बंद करा अशी नागरिक मागणी करत आहेत. जर दहा ते पंधरा दिवसात या मागणीचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपशहर प्रमुख रुपेश भोईर यांनी दिला आहे.