महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी

सोलापूर/प्रतिनिधी – आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर हल्ला करणार्यां समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच दीपक केदार यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात अज्ञात समाजकंटकानीं गाडीवर हल्ला करून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला आहे.असा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी मागण्यांचे निवेदन तहसिलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले.

तहसिलदाराना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आँल इंडिया सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर ता.सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी हल्ला केला असून त्यांना जीवे प्रयत्न केला आहे.हा हल्ला नियोजन पूर्वक असून गाडी अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष भीमराज गोटे गंभीर जखमी झाले आहेत.हा हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी.दीपक केदार संपूर्ण महाराष्ट्रभर अनुसूचित जाती,जमाती,मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याला वाचा फोडण्याचे काम करत असताना काही मनुवादी लोकांनी दीपक केदार यांच्या गाडीवर हल्ला चढवला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो व आरोपींना तात्काळ अटक करून दीपक केदार यांना संरक्षण देण्यात यावे.तसेच दीपक केदार यांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा.या हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक नाही झाल्यास ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.पुढील होणाऱ्या परिणामास शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राजन सिरसट,नेमिनाथ सिरसट,तानाजी सिरसट,विवेक लोंढे,हरी शिंदे,अनिल सिरसट,आकाश सिरसट,प्रवीण सिरसट,गोविंद सिरसट आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×