सोलापूर/अशोक कांबळे – रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत सन २०१९ – २०२० या वर्षात एकूण १८९ प्रस्ताव मंजूर झाले होते.मोहोळ नगर परिषदेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी एकूण फाईली पैकी २८ फाईली द्वेष भावनेने गायब केल्या असल्याचा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी विजय सरवदे,सतीश क्षीरसागर,अशोक गायकवाड यांनी केला आहे.या प्रकरणाशी संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी सदर मागणीचे निवेदन मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मोहोळ नगर परिषद अंतर्गत सन २०१९-२०२० या कालावधीत मंजूर रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या एकूण १८९ फाइल्स पैकी २८ फाइल्स द्वेष भावनेने संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने लाभ न मिळण्याच्या हेतूने परिपूर्ण कागदपत्रे असून ही त्या फाइल्स गायब केल्या आहेत.
तरी सदरचे संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व प्राप्त प्रस्ताव फाइल्स लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा.अन्यथा २८ जून २०२१ रोजी मोहोळ नगर परिषदे समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर विजय सरवदे,सतीश क्षीरसागर,अशोक गायकवाड यांच्या सह्या आहेत