नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व गुजर समाजाबाबत युवासेनेचे विस्तारक शरद कोळी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आज समाजबांधवांनी निवेदन देण्यात आले. दोन दिवसापूर्वी धरणगाव येथे महाप्रबोधन यात्रा पार पडली होती. यात युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली होती. यामुळे गुजर समाजबांधवांमध्ये अतिशय संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांना देण्यात आले.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना समाजबांधवांनी आपली भूमिका मांडली. यात ते म्हणाले की, शरद कोळी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा, त्यांच्या कुटुंबियांचा तसेच गुजर समाजाचा अपमान करणारी अतिशय शेलक्या भाषेतील वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.