नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी – गणुर येथे हरणाच्या पाडसाचा वन विभागाच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील गणुर येथे आज समाधान जाधव यांच्या वस्तीजवळ मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक हरणाच्या पाडसाला जीव गमवा लागला. सामाजिक कार्यकर्ते गणेश ठाकरे यांनी असा आरोप केला आहे की, वन विभागाला फोन द्वारे कळविले केले असता ते वेळेत पोहोचले नसल्यामुळे या हरणाच्या पाडसाला जीव गमवावा लागला.
त्यानंतर दोन ते तीन तासाने वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले,तोपर्यंत हरणाच्या पाडसाला तेथील कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरी नेऊन आडोशाला ठेवले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी हे वेळेत पोहोचले नसल्यामुळे अखेर त्या पाडसाने जीव सोडला असे सामाजिक कार्यकर्ते गणेश ठाकरे यांनी सांगितले.यावरुन वन्य प्राण्याच्या प्रती किती गंभीर आहे याचा प्रत्येय येतो.