महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image क्रिडा लोकप्रिय बातम्या

किकबॉक्सिंग स्पर्धेत दीप जोगलला सुवर्ण पदक

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – २ ते ६ नोव्हेंबर  दरम्यान नवी दिल्ली येथे दुसरी “वाको इंडियन ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग टूर्नामेंट २०२२” यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेत एकूण सहा देशातील ९०० स्पर्धक सहभागी झाले होते. किकबॉक्सींग हा खेळ पॉइंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, फुल कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक आणि म्युझिकल फॉर्म या अशा विविध प्रकारात खेळला जातो. ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनतर्फे दीप जोगल याने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि पॉइंट फाईट व म्युझिकल फॉर्म या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण पदके जिंकत दैदीप्यमान कामगीरी केली आहे.

दीप जोगल गेली दहा वर्षे सातत्याने सेन्साय संजय कटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील “बो इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्ट” मध्ये कराटे व किकबॉक्सिंगचे शास्त्रशुध्द पध्दतीने प्रशिक्षण घेत आहे. सेन्साय संजय कटोडे हे स्वत: आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु

असल्याने त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा दीप जोगला झाला आहे. रेन्शी मोहन सिंग, अध्यक्ष, ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे यांचेही अद्यावत तांत्रिक बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन दिप जोगल यांस प्राप्त होत असते.

जगन्नाथ शिंदे यांनी दिप जोगलवर विश्वास दाखुन या स्पर्धेसाठी प्रायोजित केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले असून ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन व निलेश शेलार, अध्यक्ष, वाको महाराष्ट्र, यांच्यातर्फे दीप जोगलचे हार्दिक अभिनंदन व भविष्याकरीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×