नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – नीती आयोगाप्रमाणेच राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबत आयोगाकडून सूचना प्राप्त झाली होती. ‘मित्र’ ला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ व दैनंदिन कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ असेल. नियामक मंडळात उप मुख्यमंत्री सह अध्यक्ष राहतील तसेच उपाध्यक्ष पदी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल.
18 सप्टेंबर, 2022 रोजी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर तज्ञ, विविध प्रशासकीय विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती.
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत “विकसित भारत- भारत@2047 (India@2047)”करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. तसेच, सन 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे.
यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वात मोठी आहे. भारताच्या सकल उत्पन्नामध्ये (GDP) राज्याचा वाटा 15% आहे. राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये सन 2020-21 करिता कृषी, सेवा क्षेत्र, व उद्योग क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 13.2%, 60% व 26.8% आहे.
नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेशक विकास साधणे हा मित्रच्या स्थापनेचा हेतू आहे. मित्र ही राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारी थिंक टँक असेल. मित्र राज्य शासनाचे विविध विभाग, भारत सरकार, नीती आयोग, सिव्हिल सोसायटी, विविध अशासकीय संस्था तसेच खाजगी व्यावसायिक संस्था यांच्यात सन 2047 पर्यंत राज्याचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने समन्वयाचे काम करेल.
भारतीय घटनेच्या अनुच्छेद 246 नुसार, 7 व्या अनुसूचीमधील दुसऱ्या सूचीद्वारे राज्य शासनाकडे सोपविलेल्या विषयांपैकी कृषी व संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास व नाविन्यता, नागरीकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन आणि क्रीडा, ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल, उद्योग आणि लघु उद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण या पारंपरिक क्षेत्रावर मित्र द्वारे लक्ष केंद्रीत करण्यात येईल. त्याचबरोबर या क्षेत्रांच्या प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी पूरक असणारे नावीन्यपूर्ण क्षेत्र- ड्रोन टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व मशिन लर्निंग, Internet of Things- IOT, Cloud Computing, सायबर सुरक्षा (Cyber Security), Robotics, GIS, Block chain यांचा देखील समावेश करण्यात येईल. ‘मित्र’ द्वारे पर्यावरण, वातावरणीय बदल, वने आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरदेखील लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे मोठ्या प्रमाणावर डेटा तयार होतो. हा सर्व डेटा एकत्रित करुन अद्ययावत डेटा विश्लेषण टूल्सच्या आधारे तिचे संस्करण करुन ती माहिती निर्णय प्रक्रियेत वापरण्याच्या दृष्टीने राज्य डेटा प्राधिकरण तयार करण्यात येईल. राज्य नियोजन मंडळ, मानवविकास आयुक्तालय, अर्थ व सांख्यिकी संचालनालय अंतर्गत कार्यरत मुल्यमापन शाखा व शाश्वत विकास ध्येय-अंमलबजावणी व समन्वय केंद्र ही कार्यालये मित्र मध्ये समाविष्ट करण्यात येतील.
विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राकरिता पुनर्गठित करण्यात आलेले वैधानिक विकास मंडळ मित्र साठी प्रादेशिक मित्र म्हणून काम करतील. राज्याच्या विकासात प्रादेशिक समानता आणण्याच्या दृष्टीने प्रादेशिक मित्र महत्त्वाची भूमिका पार पाडतील. त्या त्या प्रदेशातील अडचणी किंवा समस्या समजून घेऊन मित्रच्या माध्यमातून राज्य पातळीवर सुयोग्य उपाययोजना तयार करण्यात येतील.
Related Posts
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा…
-
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या…
-
हेरिटेज ट्री संकल्पना, ५० वर्षावरील झाडांना जतन करण्याचा निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र नॅशनल कॅडेट…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NITवर काढला बडग्या मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - नागपूरात आज…
-
महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - महाराष्ट्र लघु…
-
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिन २६…
-
रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या नांदेड…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा…
-
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील…
-
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची निषेध द्वारसभा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आज विवीध संघटनेतर्फे…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात…
-
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. संभाजीनगर/प्रतिनिधी- वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि…
-
अन्न सुरक्षा निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - अन्न सुरक्षा क्षेत्रात उत्तम…
-
लव यू महाराष्ट्र टीमने कोरोनाच्या संकटात दिला जनसामान्यांना मदतीचा हात
सोलापूर/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे.या…
-
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र,पदाधिकाऱ्यांची झाली घोषणा
मुंबई/प्रतिनिधी -डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा…
-
समीर कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्र सदनाचे निवासी…
-
महाराष्ट्र पर्यटनाचे सुधारित संकेतस्थळ व महाराष्ट्र टुरिझम मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे.…
-
ब्रम्हपुरीत रंगला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. चंद्रपुर/प्रतिनिधी - ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण…
-
महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणिकरण यंत्रणेची स्थापना करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
नवी मुंबई - महाराष्ट्र सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यास आज…
-
मंत्रालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी, त्यावरील…
- वंचित बुहजन आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी(संघर्ष गांगुर्डे नेशन न्युज मराठी.)
दि.- २४ वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे.…
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या…
-
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याणच्या वैष्णवी पाटीलची धडक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे- कल्याण जवळील मंगरूळ…