प्रतिनिधी.
मुंबई – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास मंत्री श्री.मलिक म्हणाले की, सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी ४८ टक्के महिला असून देशातील एकूण उद्योजकांपैकी फक्त १४ टक्के महिला उद्योजक आहेत. राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात येईल.
महिला उद्योजकता कक्षामार्फत महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नॅसकॉम, सीआयआय, फिक्की, असोचॅम आदी विविध नामांकीत संस्थांसमवेत भागीदारी करण्यात येईल. महिला बचतगट, महिला उद्योजक यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत महिलांना स्वव्यवस्थापन, आर्थिक व डिजिटल साक्षरता, व्यवसाय नियोजन व विकास आदी प्रशिक्षणे देण्यात येतील. याशिवाय महिला उद्योजकांसाठी नवीन इनक्यूबेटर्स स्थापित करणे, विद्यमान इनक्युबेटर्समार्फत महिला उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे, मार्गदर्शन करणे यावर हा कक्ष लक्ष केंद्रीत करेल. महिला उद्योजकांच्या चालविण्यात येणाऱ्या विकसीत स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविण्यात येईल. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात अर्थसहाय्य करणे, विकसीत स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे इत्यादी करिता महिला उद्योजकता कक्षामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतील, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच उद्योजकता विकसीत करण्यासाठी महिला उद्योजकता कक्षामार्फत राज्यातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये, महिला महाविद्यालये आदींमध्ये विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करण्यात येईल. या क्लबमार्फत विद्यापीठस्तरावर तसेच आंतरविद्यापीठ, आंतरमहाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, प्रशिक्षणे, अभ्यासदौरे, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येतील. विद्यापीठांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या गांधी विचारधारा केंद्र, ग्रामीण अध्ययन केंद्र, महिला विकास कक्ष याप्रमाणे ‘विद्यार्थिनी उद्योजकता केंद्र’ स्थापन करण्यात येतील.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यकारी व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये कौशल्य विकाससह महिला-बालविकास, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग या विभागांचे सचिव, एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे कुलगुरु, महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकीत संस्था, युएनडीपी, युएन वुमन, युनिसेफ यांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असेल, अशी माहितीही मंत्री श्री.नवाब मलिक यांनी दिली.
Related Posts
-
ब्रम्हपुरीत रंगला महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचा थरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. चंद्रपुर/प्रतिनिधी - ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण…
-
महाराष्ट्र राज्य हिंदी, गुजराती, सिंधी भाषेतील साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या हिंदी,…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याणच्या वैष्णवी पाटीलची धडक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे- कल्याण जवळील मंगरूळ…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कबड्डी महिलांमध्ये पुणे व रायगडची आगेकूच
नेशन न्यूज मराठी टीम. बारामती/प्रतिनिधी - विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या पुणे…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा
नवी दिल्ली/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन…
-
महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत वंचितला जाहीर पाठिंबा
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा
मुंबई/प्रतिनिधी - राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक…
-
५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने…
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा दणदणीत विजयी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुपरस्टार रेडर पुजा यादव आणि…
-
महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे कोरोना नियंत्रण उपायांमध्ये विशेष प्रकल्प
प्रतिनिधी. मुंबई - कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील आणि आशा वर्कर्स यांचा सन्मान
भिवंडी/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा…
-
मंत्रालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न
प्रतिनिधी. मुंबई - शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी, त्यावरील…
-
महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे २०२१ ची परतफेड १० ऑगस्ट २०२१ रोजी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.11/प्र.क्र.2/ अर्थोपाय…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिला आयोग महिलांशी संवाद…
-
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे विविध धोरणात्मक प्रश्नांसाठी आंदोलन
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/RnNRBqDPcq0 कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज कंपन्यांमधील…
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ढोल बजाव आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - उद्योगांच्या खाजगीकरणा…
-
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन नागपूर मध्ये साधेपणाने साजरा
नागपूर/ प्रतिनिधी - आजपासून राज्यात सर्वत्र 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम…
-
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत १५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या 8 वर्ष मुदतीच्या एकूण…
-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा
नवी दिल्ली प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक महोत्सवी…
-
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे लाक्षणीक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला/प्रतिनिधी - राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी,मुख्याध्यापक,…
-
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त सोडतीच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ; १२ एप्रिल रोजी सोडत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या गुढीपाडवानिमित्त…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे १४ वे राज्य अधिवेशनानिमित्त दिंडीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - भारतीय खेत मजूर युनियन…
-
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कृषी पणन…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
अंधश्रद्धेमुळे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे राज्य महिला आयोगा कडून आवाहन
नेशन न्युज मराठी टिम. https://youtu.be/u0e6Wy9EX6k मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रामध्ये गेल्या काही…
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कडून “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील युवकांच्या नाविन्यतेस चालना…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
ठाणे येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…