सोलापूर/प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य 15 फूट उंचीचा ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.शुक्रवारी नियोजन भवन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. या बैठकीस कार्याध्यक्षा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच सदस्य नगरसेवक चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब बंडगर, अशोक पाटील, गेना दोलतोडे, आदित्य फत्तेपुरकर, अस्मिता गायकवाड, सारिका पिसे आदी उपस्थित होते. समितीचे सदस्य आमदार रोहित पवार हे ऑनलाइन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वागत केले. समन्वयक प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची माहिती दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती गठीत केली असून त्याची पहिलीच बैठक शुक्रवारी पार पडली. विद्यापीठाच्या 480 एकर जागेत उभारत असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा व स्मारक उभारण्याचा निर्णय झालेला असून येथे चबुतरावर 15 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय सर्वानुमते ठरला. प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी ब्रांझमधील अहिल्यादेवींचे शिल्प तयार करण्यासाठी एक कोटी 90 लाख 40 हजार रुपये अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. शिल्पाचे विविध मॉडेल तयार करणार आहेत. त्यानंतर समिती सदस्यांनी शिल्प पाहून निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले.
शिल्प उभारण्याचा खर्च विद्यापीठाकडून केला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित लँडस्केप, सुशोभीकरण, चबुतरा निर्मितीसाठी विद्यापीठाचे वास्तुविशारद असलेल्या डिझाईन कंपनी, मुंबईकडून पाच कोटी खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. सदरील खर्च राज्य शासन करणार असून या निधीसाठी सर्व सदस्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जबाबदारी सोपविली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सोलापुरात लवकरात लवकर व्हावे आणि यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. आमदार रोहित पवार यांनीही अहिल्यादेवींचे आदर्श कार्य युवा पिढीला समजावे आणि त्यातून त्यांना दिशा मिळावी असे चांगल्या दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु, असे सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारकाचा चांगला आराखडा तयार केलेला आहे. भव्य पुतळ्यासाठी विद्यापीठाकडून एक कोटी 90 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत तर लँडस्केप, चबुतरा व सुशोभीकरणासाठी पाच-साडेपाच कोटी रुपये निधी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करून आवश्यक निधी मिळवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक सोलापुरात उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Related Posts
-
राज्य सरकारचा मोठा निर्णय, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा…
-
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि…
-
कोवीड रुग्णांवर विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचा केडीएमसीचा निर्णय
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक…
-
दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक…
-
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी मंत्रीमंडळाने घेतला हा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि…
-
कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार अनुभवला असून…
-
पेट्रोल पाच, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त,राज्य सरकारचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पेट्रोलच्या करात पाच…
-
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक…
-
जून-२०२१ पासून पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…
-
वंचितच्या लढ्यामुळे कंत्राटीकरणाचा शासन निर्णय रद्द - सुजात आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - राज्यात शिंदे - भाजप…
-
भरदिवसा खुनाच्या घटनेनंतर , मृतदेह न स्वीकारण्याचा मृताच्या संतप्त नातेवाईकांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक शहरामध्ये…
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या…
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या…
-
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील महाविद्यालयातून तासिका (सीएचबी) तत्त्वावर…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर
सोलापूर/अशोक कांबळे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा…
-
वगळलेली १८ गावे पुन्हा केडीएमसीतच ठेवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेतून काही महिन्यांपूर्वी वगळण्यात आलेली…
-
महिला आर्थिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
आता या स्टोअरमध्ये मिळणार वाईन, सरकारचा मोठा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक…
-
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत…
-
पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा…
-
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी…
-
आता शाळाही अधांतरीच,सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार - प्रकाश आंबेडकर
पुणे - देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता covid-19…
-
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार - परिवहनमंत्री अनिल परब
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
-
येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा – नगरविकास विभागाचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा लवकरच औरंगाबाद मध्ये उभारण्यात येणार
पुणे/प्रतिनिधी - औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी…
-
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचा यंदाचा गाळप हंगाम…
-
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या…
-
कल्याण मधील गिर्यारोहकांनी सर केला २६० फूट उंच वजीर सुळका
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला…
-
लोकशाहीला घातक असे निर्णय भाजपा सरकार कडून घेण्यात येत आहेत - नाना पटोले
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी…
-
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार,महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात…
-
सरकारने बॉर्डरवरचा 21000 टन कांदा विदाऊट ड्युटी सोडावा यानंतर आम्ही निर्णय घेणार -व्यापारी
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्रसरकारने कांद्याच्या…
-
महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय.२२ सनदी अधिकाऱ्याच्या बदल्या
मुंबई:- महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनात मोठे फेरबदल…
-
सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार – ऊर्जामंत्री
प्रतिनिधी. मुंबई - प्रत्यक्ष कार्यस्थळावर काम करत असताना येणाऱ्या अडचणी…
-
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना…
-
मोहोळ नगर परिषदेच्या जाहिराती जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावण्याची युवा भीम सेनेची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर- मोहोळ नगरपरिषदेने भिंतीवर लावलेल्या जाहिरातीवर नागरिक लघुशंका करीत…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्यअतिशय दुर्दैवी- छगन भुजबळ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नवी दिल्ली मधील महाराष्ट्र…
-
गोदी कामगारांचा महागाई भत्ता गोठविण्यास अंतरिम स्थगिती,मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र सरकारच्या महागाई भत्ता गोठवणूक धोरणाविरुद्ध मुंबई…