नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – सामाजिक न्याय हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज जिल्हा परिषद आवारात बांधकाम विभागांर्फत झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांनी केलेल्या कामाची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी या मागणी साठी आमरण उपोषण करण्यात येत आहे.
बांधकाम विभागाने २०२१ ते २३ या कालावधीत अनेक विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला आहे . विकास कामांवर आलेला निधी सत्ताधारी पक्षांच्या वरद हस्तामुळे कार्यकारी अभियंता आपल्या मर्जीतील अभियंते व ठेकेदार यांना देतात. ३०५४ ते २७२२ या लेखा शीर्षक अंतर्गत आदिवासी विकास खात्याने दिलेल्या २५० कोटीचे रस्ते कामात,कामे न करता ५०% बिले संबंधित ठेकेदार व अभियंता यांनी काढून घेतले आहे .
याबाबतीत चौकशी समिती नेमलेली असली तरी चौकशी करणारे यंत्रणेवरच भ्रष्टाचाराचे आरोप असताना सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना येथील अभियंती यांनी जी चौकशी केली ती भ्रष्टाचारावर पांघरून घालणारी आहेत. सदर प्रकरण न्यायालयात सुरू असली तरी यातील चौकशीचा तयार झालेला अहवाल जनतेसाठी सार्वजनिक करण्यात यावा, १६ लेखाशीर्ष अंतर्गत कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व जिल्ह्यात बोगस मजूर कामगार सहकारी सोसायटी आणि मार्फत अनेक कामे दिली गेली आहेत. त्या सर्व सोसायटींची कामाची चौकशी व ती कामे रद्द करावी ,अभियंते ठेकेदार म्हणून शासकीय निधीच्या स्वरूपात राजकीय वरद हस्ताने सामील झाले आहेत त्या सर्वा विरुद्ध कारवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक न्याय हक्क परिषद व वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे, यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.