नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी -शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांचे अंतर्गत दामिनी पथकाची स्थापना करण्यात आलेली असून सदर पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, पोलीस हवालदार अनुराधा धाकड पोलीस नाईक पौर्णिमा पाटील, पो.शि. अनिता पावरा, हे कामकाज पाहाणार आहेत.शिरपूर शहरातील मुलामुलींमध्ये पोलीसविषयी असलेली भीती दूर करून पोलीस काका तसेच पोलीस दीदी या उपक्रम अंतर्गत शाळा,कॉलेज मधील मुलींमध्ये जनजागृती करून शासनाने त्याचेसाठी केले असलेले पोक्सो कायदा,स्वताचे रक्षण कसे करावे याबाबत हे पथक मार्गदर्शन करणार आहे.
तसेच डायल ११२ तसेच प्रसार माध्यमांचा वापर कसा करावा त्यामुळे काय परिणाम होतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलामुलींसाठी रस्त्याने छेड काढणारे टवाळ मुलांवर कारवाही करणेकामी, सोनसाखळी चोर यांचेवर कारवाही करणेकामी, तसेच महिलांचे फसवणुकीचे गुन्हे इत्यादी अंतर्गत मार्गदर्शन करणेकमी शिरपूर शहरात पेट्रोलिंग करून कारवाही करणेसाठी सदर पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच काही तक्रारी अगर अडचणी असल्यास दामिनी पथकातील अधिकारी व अमलदार यांना संपर्क करून आपली तक्रार द्यावी.आवाहन पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी सांगितले.