नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – तापी व पूर्ण नदीला अचानकपणे आलेला पूर तसेच हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या घटनेत तब्बल दोन हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
पुराच्या पाण्यामुळे कुठलाही प्राण्याची अथवा मनुष्याची जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी तातडीने अधिकाऱ्यांना पोहोचण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः तसेच प्रांत अधिकारी मंडळाधिकारी यांनीही रात्रीतूनच संबंधित पुरग्रस्त भागाची पाहणी केली.
पूरग्रस्त भागातील ज्या गरोदर महिला आहेत या महिलांना शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आला आहे. तसेच या पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्न पाण्यासह औषधांची सुद्धा सुविधा पुरविण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने महसूल विभागाचे अधिकारी पूरग्रस्त भागाचे पंचनामे करत आहे.सद्यस्थितीत पुराचे पाणी कमी झाले आहे. पूर ओसरला असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी स्पष्ट केले