महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पुण्यात राज्यपालांच्या हस्ते दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे / प्रतिनिधी – साधू वासवानी मिशनचे अध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,  यांच्या हस्ते आज साधू वासवानी मिशन, पुणे येथे करण्यात आले. या वेळी केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान, इंदूरचे खासदार शंकर लालवाणी,  साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख कृष्ण कुमारी धाडानी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल, श्री. कृष्णकुमार शर्मा, पुणे विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री.रामचंद्र जायभाये यांच्यासह टपाल विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला  राज्यपाल आणि इतर प्रमुख पाहुण्यांनी साधू वासवानी यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर सर्वांनी साधू वासवानी यांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘दर्शन’ संग्रहालयास भेट दिली.

या कार्यक्रमानंतर केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी वारसा स्थळ असलेल्या ब्रिटिशकालीन पुणे मुख्य टपाल कार्यालयास (जी.पी.ओ.) भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी कार्यालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागांच्या कार्याची पाहणी केली व  सामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

यावेळी चौहान यांच्या हस्ते लहान मुली आणि महिलांना  सुकन्या समृद्धी खाते आणि महिला सन्मान बचत खाते यांचे पासबुक वाटप देखील करण्यात आले. त्यांच्या हस्ते मृत विमाधारकाच्या नातेवाईकाना ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक’ (आई.पी.पी.बी.)मार्फत काढलेल्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. भारतीय डाक विभाग आणि ‘इंडिया पोस्ट पेमेंटस बँक'(आई.पी.पी.बी.) मुळे सामान्य नागरिकांना विविध प्रकारचे बचत खाते आणि विमा संरक्षण उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याचे श्री.चौहान यावेळी म्हणाले.

सध्याच्या डिजिटल युगात टपाल खाते देखील अत्याधूनिक होत असून लवकरच पासपोर्ट सुविधा देणारी टपाल कार्यालय देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात सुरू केली जाणार असल्याचे श्री . चौहान म्हणाले . याशिवाय देशाच्या ग्रामीण भागात प्रत्येक 5 किलोमिटर अंतरावर बँकिंग सेवा पुरवण्यासाठी पोस्ट पेमेंट बँका सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटी वेळी  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा सर्कल, किषणकुमार शर्मा, पोस्टमास्तर जनरल, पुणे क्षेत्र, रामचंद्र जयभाये,  निदेशिका डाकसेवा, सिमरन कौर यांच्यासह टपाल कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×