महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

दि. बा. पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट

नेशन न्यूज मराठी टीम.

भिवंडी/संघर्ष गांगुर्डे – भुमिपुत्रांचा आवाज असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून लवकर मंजूर होण्यासाठी दि. बा. पाटील नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची आज भेट घेतली. तसेच केंद्र सरकारकडून नामकरणाला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी विनंती केली. त्याचबरोबर दिबांच्या नावासाठी सर्वप्रथम २०१६ मध्ये लोकसभेचे लक्ष वेधल्याबद्दल आभार मानले.

नवी मुंबईतील नियोजित विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लोकसभेमध्ये २०१६ मध्ये केली होती. तसेच दिबांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या सुरुवातीच्या काळात नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर नवी मुंबईसह रायगड व ठाणे जिल्ह्यात चळवळ उभी राहिली होती. या आंदोलनातही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाग घेतला होता.

राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात, जनभावनेचा आदर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांचे नाव देण्यास मंजुरी दिली होती. या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी विनंती दि. बा. पाटील नामकरण समितीचे पदाधिकारी माजी खासदार जगन्नाथ पाटील, रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुभाष भोईर,दशरथ पाटील, जगदीश गायकवाड, संतोष केणे, दशरथ भगत, राजेश गायकर यांच्यासह समितीतील पदाधिकाऱ्यांनी आज केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ व भाजपाचा दिबांच्या नावाला पाठिंबा आहे. त्यामुळे संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होऊन विमानतळाला दिबांचे नाव मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »