नेशन न्यूज मराठी टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळाच्या क्षेत्रात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी लावण्यासाठी नवी मुंबई पंचक्रोशीतील भूमिपुत्र जमले होते. राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नवी मुंबई विमानतळाबाबत विलंब केला जात आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी एकत्र येत, नवी मुंबई येथील विमानतळाच्या जागी दि. बा. पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ असा फलक लावण्यात आला.
शासनाकडून कृती समितीला वारंवार नामकरण प्रस्ताव लवकरात लवकर दिल्लीत पाठवला जाणार असे सांगितले जात आहे. तरी यांच्या पाठपुराव्यासाठी कृती समिती सांकेतिक अर्थाने क्रांती दिनाचे औचित्य साधून दि. बा. पाटील यांचे फलक लावण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आवारात बुधवारी क्रांतिदिनाचे औचित्य साधत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा फलक दि.बा.पाटील प्रेमीं भूमिपुत्रांतर्फे तरघर – उलवे विमानतळ एन्ट्री पॉईंटवर लावण्यात आला. सरकारने लवकरात लवकर विमानतळाचे नामकरण करावे अन्यथा माेठे आंदाेलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला. कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सर्वपक्षीय आजी-माजी आमदार यांच्यासह नेते, संघर्ष समिती उपाध्यक्ष गुलाब वझे आणि दि.बा. प्रेमीं भूमिपुत्र शेकडोच्या संख्येने उपस्थित हाेते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ठिकाणी बुधवारी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी लावून आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामफलकाचे अनावरण करण्यासाठी डोंबिवलीतून आगरी महोत्सव समिती आणि 27 गांव सर्व पक्षीय हक्क संरक्षण समिती माध्यमातून उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी विश्वनाथ रसाळ, दत्ता वझे, शरद पाटील, दीपक पवार, सदाशिव भोईर, वसंत पाटील, विजय पाटील, भास्कर पाटील, बाळाराम ठाकूर, जितेंद्र ठाकूर, भगवान पाटील, गजानन मंग्रुळकर, लालचंद भोईर, संतोष पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गुलाब वझे म्हणाले, ९ ऑगस्ट क्रांतीदिन असून खऱ्या अर्थाने देशात क्रांतीला सुरुवात झाली होती. आजच्या दिवशी आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निश्चित शासनाने केले. विधानसभेत विधानपरिषदेतहि ठराव पास झाला आहे. शासनाचीही तयारी झाली आहे. मात्र या कामाला उशीर होत असल्याने सर्व भूमिपुत्रांमध्ये, चारही जिल्ह्यामध्ये याबदल नाराजी पसरली आहे. हा ठराव केंद्रात पाठवला पाहिजे. हा निर्णय देऊ, मात्र याला उशीर होत असल्याने तत्परता दाखविण्यासाठी दि.बां चे फलक सर्वांनी लावले. हे फलक कोणी काढणार नाही, हिम्मतही करणार नाही, जर असं चुकीचे पाउल उचलले तर न भूतो न भविष्यती असे आंदोलन होईल. पण अशी वेळ येणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट झाली होती ते ही यासाठी सकारात्मक आहेत पण लवकर याची केंद्रस्तरावर अधिकृत घोषणा लागावे अशी आमची भूमिका आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याप्रकरणी राज्यस्तरीय शासकीय कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यासाठीची मान्यता देण्यात आली. पण पुढील केंद्र सरकारच्या कार्यवाहीसाठी लागणारा पाठपुरावा ताबडतोब करावा अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. सरकारने लवकरात लवकर विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर आझाद मैदानावर पायी मोर्चा काढू असा इशारा दि.बा प्रेमींनी दिला आहे.