डोंबिवली/प्रतिनिधी- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. गेल्या वर्षातही अनेक महिने राज्यासह देशभरात लॉकडाऊन लागू होता. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले असतानाच ऐन लॉकडाऊनमध्ये डोंबिवलीकर बँक खातेदारांवर सायबर हल्ला झाला आहे. आयडीबीआय बँकेच्या डोंबिवली शाखेतील काही खातेदारांचे अकाऊंट रिकामे झाल्याने खळबळ माजली आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आजही लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत डोंबिलीतून धक्कादायक घटना बाहेर आली आहे. आयडीबीआय बँके डोंबिवली शाखेतून तब्बल 30 ग्राहकांचे पैसे गहाळ झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बँक प्रशासन मात्र काही बोलण्यास तयार नाही. मात्र पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला असून तपासही सुरु केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडे फडके रोडला बाजीप्रभू चौकात आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या शाखेत असलेल्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे गहाळ झाल्याची बातमी कळताच गुरुवारी सकाळपासून बँकेत गर्दी झाली. या बँकेतील अनेक खातेदारांचे पैसे ऑनलाईनद्वारे परस्पर काढण्यात आले. राज्यात आधीच लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे भयानक परिस्थिती आहे. कोरोनाची लागण झाली तर औषधांसाठी भरपूर खर्च येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे जवळ असणे महत्वाचे आहे. मात्र बँकेतील अकाऊंटमध्ये असलेले पैसे असे अचानक कुणीतरी ऑनलाईन पद्धतीने काढून नेल्याने या खातेदारांची पाचावर धारण बसली आहे. खात्यातून पैसे वजा झाल्याचे मोबाईलवर मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मात्र खातेदारांनी बँकेकडे धाव घेऊन तेथील प्रशासनाला विचारणा केली. मात्र उत्तरे नीट मिळत नसल्याने ज्या खातेदारांच्या खात्यातून ऑनलाईन अचानक पैसे कापले गेले त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. खातेदारांनी पोलिसांना सांगितले की, कमीत कमी 50 खातेदारांच्या खात्यातून पैसे गहाळ झाले आहेत. मात्र पैसे गहाळ झाल्यानंतर बँकेकडून जी प्रक्रिया करण्यास सांगितली गेली, ती सुद्धा ग्राहकांना त्रासदायक होती. एकीकडे पैसे गेले. दुसरीकडे प्रक्रियेत तासंतास गेल्याने खातेदार हैराण झाले. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच छडा लावला पाहिजे, अशी खातेदारांची मागणी आहे.
या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास इन्कार केला. या प्रकाराविषयी डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी सांगितले की, या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांची तक्रार प्राप्त झाली आहे. बँकेच्या बाजूला एटीएम मशीन आहे. या मशीनमधूनच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जास्त ग्राहकांनी या मशीनचा वापर केला आहे. आरोपींनी एटीएममध्ये स्क्रिनिंग-स्कॅनिंग केले असावे. त्याआधारे ऑनलाईनद्वारे पैसे काढले गेले असावेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेतला जात आहे, असेही एसीपी जय मोरे यांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे, अशी मागणी फसगत झालेल्या खातेधारकांकडून करण्यात आली आहे.
Related Posts
-
एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दि. २१…
-
बँकेतील कॅश काउंटरवर २ महिलांनी हाथचालाखी करून ग्राहकाचे पैसे केले लंपास,घटना सीसीटीव्ही कैद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बुलढाना/प्रतिनिधी - नांदुरा येथील मारवाडी…
-
ऊसाच्या मळ्यात दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - करंजवडे येथील…
-
भिवंडीत एबीपी माझाच्या पत्रकारावर हल्ला ; कोरोना संदर्भातील बातमी करतांना झाला हल्ला
भिवंडी - एकीकडे जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना प्रतिबंध…
-
जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळे महानगरपालिका हद्दीत नुकताच…
-
गाडी आडवी लावली म्हणून पोलिसांवरच तलवारीने हल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी…
-
नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे टाळण्यासाठी जनजागृती
नेशन न्यूज़ मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी - सायबर गुन्हे टाळण्यासाठी…
-
पोलिसांवर हल्ला करणारा मोस्ट वॉंटेड आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - चोरी, वाहनचोरी,…
-
महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरयाणा/प्रतिनिधी - सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना…
-
औरंगाबादकरांना २ ऑक्टाेबरपासून रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/ प्रतिनिधी -औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक…
-
महिलेवर प्राणघातक हल्ला करून चैन हिसकावणारा चोरटा जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - रस्त्याने चालणाऱ्या महिलेची चैन…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे…
-
ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली शहरातून एक…
-
भिवंडीत फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
प्रतिनिधी. भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती असलेल्या…
-
श्री गजानन विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे जनजागृतीचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मधील श्री गजानन…
-
सायबर दूतच्या माध्यमातून नाशिक पोलिस लावणार ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाना चाप
नेशन न्यूज मराठी टिम. नाशिक/प्रतिनिधी - मागच्या काही महिन्यांपासून सायबर…
-
वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा…
-
ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील दहिवेलच्या…
-
प्रवासी कुटुंबावर हल्ला करत आरोपींनी लाखोंचे सोने केले लंपास
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. सांगली/प्रतिनिधी - उन्हाळी सुट्ट्या असल्या…
-
डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांकडून शोध सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवर…
-
बिबट्याचा शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, हल्ल्यात ९ शेळ्या व १ मेंढी ठार
दौंड/प्रतिनिधी - दौंड तालुक्यातील मिरवडी येथील मेंढपाळ संपत सोमा थोरात…
-
कल्याण मध्ये एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न फसला, चोराला पोलिसांनी रंगेहाथ ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - एटीएम मशीन तोडून मशीन…
-
कल्याणमधील इराणी वस्तीत पोलिसांवर पुन्हा हल्ला; चोरट्यांची दहशत कधी थांबणार ?
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आंबिवली येथील…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी
सोलापूर/प्रतिनिधी - आँल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्यावर…
-
पोलिसांवर जिवघेणा हल्ला करणारे फरार आरोपी गजाआड,डोंबिवली विष्णूनगर पोलीसांची कारवाई
डोंबिवली/प्रतिनिधी - घराचे दार ठोठावून नका असे सांगितल्याचा राग आल्याने…