नेशन मराठी ऑनलाइन टिम.
धुळे/प्रतिनिधी – शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावातील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल तीन कोटी रुपयांचा गांजाचे पिक असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी सदर शेतावर एलसीबीच्या पथकाने छापा मारुन सदर गांजा जप्त केला आहे. तर शेत मालक फरार झाला आहे. शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे देवा कहारु पावरा या शेतकऱ्याने त्याच्या शेतात गुंगीकारक औषधे तसेच मनोव्यापारावर परिणाम करणारे गांजा पिकाची शेतात लागवड केल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाल्याच्या आधारे ही कारवाई केली आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर शेतावर छापा टाकला असता त्यांना गांजा झाडांचे तीस किलो वजनाचे १९९ गठ्ठे व ३२ किलो वजनाचा एकूण ३ कोटी १० हजार रुपयांचा गांजा आला. सदर गांजा पोलिसांनी जप्त केला असून वरील शेतकऱ्याविरुद्ध एलसीबीचे पो. कॉ. महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पीएसआय संदीप पाटील करीत आहेत. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे.