नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – गावठी कट्टा विक्री करण्यासाठी कल्याण मध्ये आलेल्या एका गुन्हेगाराला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.दानिश अन्सारी असे त्याचे नाव आहे .दानिश ने उत्तरप्रदेश हुन हा गावठी कट्टा आणला होता. कल्याण मध्ये हा गावठी कट्टा विकण्यासाठी आला होता .कल्याण कोळसवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनकर पगारे व त्यांचे पथक रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्व आनंदवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते . याच दरम्यान पोलिसांना एक इसम या परिसरात गावठी कट्टा विकण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली . पोलिसांना एक इसम आनंदवाडी परिसरात संशयीत रित्या फिरत असल्याचे आढळून आले . पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आढळला.
त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याचं नाव दानिश अन्सारी असून त्याने यूपी येथून हा कट्टा विकण्यासाठी आणला होता कल्याण मध्ये तो ग्राहक शोधत असतानाच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . त्याच्या जवळून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. पुढील तपास सुरू आहे.