धुळे/प्रतिनिधी – शिरपूर तालुक्यातील लाकडया हनुमान शिवारातील कसत असलेल्या कपाशीच्या शेतामध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दणका दिला असून त्यांच्याकडील 721 किलो 400 ग्राम वजनाचा सुमारे 14 लाख 48 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोघ आरोपी घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाले आहे.१) मोहन श्यामा पावरा २) भावसिंग भोंग्या पावरा रा. लाकडया हनुमान तालुका शिरपूर धुळे . अशी आरोपींची नावे आहेत .अमली पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 नुसार दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव , यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली आहे.