Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीत लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथे लग्नसमारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून कठोर पावले उचलणे बाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस असल्यामुळे आणि लग्न समारंभामध्ये होणा-या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करण्या-या मंगल कार्यालय, लॉन्स सील करण्या बाबतच्या सूचनाही त्यांनी प्रभागक्षेत्र आधिका-यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गर्दी टाळणेबाबत, नियमांचे काटेकोर पालन करणेबाबत आवाहन महापालिकेमार्फत वारंवार केले जात आहे. 

 असे असतांनाही काल रात्री डोंबिवली पुर्व, येथील कोळेगांव सेंटमेरी स्कुल जवळ या ठिकाणी मोकळया जागेत एका विवाह समारंभात १०० ते १५० लोकांनी एकत्र येऊन गर्दी केल्याची माहिती प्राप्त होताच ई प्रभागक्षेत्र आधिकारी भारत पवार यांनी पोलिस आधिकारी वणवे व प्रभागातील कर्मचारी पथकासमवेत संबंधित स्थळी जावून पाहणी केली असता या विवाह समारंभात नियमांचे उल्लंघन करुन सुमारे १०० ते  १५० लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी थर्मल स्क्रिंनिगचा वापर न करणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे अशा प्रकारचे बेजबाबदार पणाचे वर्तन करुन कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

त्यामुळे या विवाह सोहळयाचे आयोजक नामदेव सखाराम पाटील, रा.नांदिवली व शंकर जोशी, रा.चिंचपाडा यांच्या विरुध्द भा.द.वि कलम 188,269,270 सह महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 सह, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांचे कलम 51(बी) सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1857 चे कलम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजिनक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन महापलिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X