महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

बनावट दारुचा कारखाना जमीनदोस्त; ७५ लाखाचा माल जप्त तर पाच जणांना बेड्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया करणे सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4 मे, 2024 रोजी मध्यरात्री 2.30 वाजेसुमारस एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुवैदिक प्रोडक्ट या कंपनीत छापा मारला असता शितपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे व रॉकेट संत्रा नामक मद्याची अवैधरित्याअ निर्मिती करुन ते बाटलीत भरताना मिळून आले. या प्रकारणात एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 15 लाख 75 हजार किमंतीच्या 45 हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, 30 लाख 30 हजार किमंतीच्या देशी मद्याचे भरलेले बॅरल, 3 लाख किमंतीच्या 1 लाख रिकाम्या बाटल्या, 6 लाख किंमतीचे लेबल पट्टी मशिन, 6 लाख किंमतीचे बुच सिल बंद करण्याचे मशिन, 5 लाख रुपये किंमतीचे पाणी शुद्धीकरण मशिन, 4 लाख 50 हजार किंमतीचे चार चाकी वाहन यासहल किरकोळ व इतर साहित्य असा एकूण 75 लाख 64 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही राज्य उत्पादक शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यंवशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शना खाली निरिक्षक डी. एम. चकोर, एस.बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी.आर.शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी.तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी.सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास डी.एम.चकोर हे करीत आहे.

Related Posts
Translate »