मुंबई-(संघर्ष गांगुर्डे ) करोना धोका दिवसन दिवस वाढत चालला आहे तो टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन करण्यात येणार आहे. राज्यातील, खासगी बस, मेट्रो,एसटी, लोकल गाड्या बंद राहतील. मात्र, जीवनावश्यक वस्तूचे दुकाने व अत्यावशक सेवा सुरु राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये परदेशातून आली आहेत त्यांना लोकान मध्ये फिरू नका असा सल्ला दिलाय, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही लोकान मध्ये फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.
लॉकडाउन दरम्यान, अन्न धान्यांचा साठा करण्याची काहीही गरज नसून त्यासाठी सर्व जीवनाश्यक वस्तू पुरवणारी दुकान चालू राहतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु राहणार आहेत. काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्च नंतरही वाढू शकते उद्धव ठाकरे यांनी सागितले आहे. दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.