प्रतिनिधी .
मुंबई -कोरोनानं मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का दिला आहे.ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत निधन झाले आहे. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी त्यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये चेक अप साठी ॲडमिट करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पुढील उपचार करण्यासाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी मतकरी यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखक, नाटककार, रंगकर्मी , चित्रपट दिग्दर्शक अशा सर्व भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीनं निभावल्या होत्या. मतकरी यांच्या गूढकथा या वाचकांमध्ये लोकप्रिय होत्या. अल्बत्त्या गल्बत्त्या व निम्मा शिम्मा राक्षस हि लहान मुलांसाठीची नाटक खूप गाजली
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या असे त्याचे साहित्यधन होते. रत्नाकर मतकरींच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या सुप्रिया विनोद, मुलगा गणेश मतकरीसून आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी क्षेत्राचे खूप मोठी हानी झाली आहे.