महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवलीतील दुकाने उद्यापासून फक्त दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे पालिकेचे आदेश.

प्रतिनिधी. संघर्ष गांगुर्डे

कल्याण- कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.त्यानंतर प्रशासनानेही आता आणखी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याचा नविन आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केला आहे. यात मेडीकल, रुग्णालये, दवाखाने,  एलपीजी गॅस यांना वगळून बाकी सर्व दुकाने दुपारी २ वाजेनंतर बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे.

कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉक डाऊनचे नियम नागरिक मोडत आहे. नागरिक मोठ्या प्रमणात गर्दी करताना दिसतायेत, गर्दी कमी होताना दिसत नाही. यामुळेच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पहाटे 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी वेळ देऊन देखील नागरिक प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाहीत. कोरोना सारख्या मोठ्या संकटाच गांभीर्य लक्षात घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील हद्दीतील किराणा दुकाने, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी आदीं दुकाने दुपारी २ वाजे वाजेपर्यंतच सुरु राहतील. यामधून मेडीकल, रुग्णालये, दवाखाने, एलपीजी गॅस केंद्र यांना वगळण्यात आले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Translate »
×