Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे लोकप्रिय बातम्या

”बंध” विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका

मिलिंद जाधव

भिवंडी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी होऊ नये म्हणून दर रविवारी पडघा मुख्य बाजारपेठ बंद असून रविवारी पडघा लगतच असलेल्या नाशिक महामार्गावर आठवडा बाजार भरला होता. या पडघा आठवडा बाजारात ”बंध” व्यावसायिकांना कोरोनाचा फटका जाणवला असून ”बंध” विक्रीसाठी आलेल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. भिवंडी तालुक्यातील पडघा हे ठिकाण अनेक खेड्या गावांचे केंद्रबिंदु म्हणून मानले जाते. ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय शेती म्हणून आढळून येतो. ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत धान्य पिकवले जाते. शेतीच नुकतच पिक आले असून लवकरच भात कापणीला सुरुवात होणार आहे. त्याच भाताचे भारे बांधण्यासाठी ग्रामीण भागात बाबुं पासुन बनविलेल्या बंधचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. बांबु ओला असतांना त्याला ठेचून ४ ते ५ दिवस सुकवून “बंध” बाजारात विकायला आणला जातो. पडघा आठवडा बाजारात नुकतेच “बंध” विक्रीसाठी आले असून पडघा परिसरातील शेतकऱ्यांनी बंध खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी पाच्छापूर,उबरखांड, नेवाडा, खातीवली, सारमाल, डोहोळे,पडघा तर आदी ठिकाणाहुन आदिवासी महिला व पुरुष बंध विक्रीसाठी आले होते. बंध १०० ते १५० रुपये शेकडा असून एक बंध प्रत्येकी एक ते दीड रुपयाला पडतो. असे विक्रीसाठी आलेला प्रत्येक एक व्यक्ती १००० ते १५०० रुपये कमवितो असे बंध विक्रेत्यांनी बोलतांना सांगितले. रोजचा खर्च सुटेल या आशेवर आदिवासी बांधव शेती बरोबरच वर्षांतून एकदाच आणि ७ ते ८ दिवसाचा हा व्यवसाय करतात. सध्या कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी प्रमाणे बंधची चांगली विक्री झाली नाही, म्हणून बंध विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली.

Translate »
X