प्रतिनिधी .
मुंबई – राज्यात दिवसन दिवस कोरोना संसर्ग रुग्ण वाढत आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने अत्यावशक/ आपत्कालीन सेवा वगळता सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना एक दिवसाआड सेवेत बोलावून ५० टक्के उपस्थिती राखण्यास मार्च महिन्यात परिपत्रक जारी केले होते. मात्र हे परिपत्रक प्रशासनाने कायम ठेवले असून आता पुन्हा या परिपत्रकाचा आधार घेत सुधारित परिपत्रक जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्याची उपस्थिती ५० टक्के असेल त्याचाच पूर्ण पगार निघेल आणि ज्याची उपस्थिती ५० टक्क्यापेक्षा कमी असेल त्याचे वेतन उपस्थितीनुसार काढले जाईल. म्हणजेच आता कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली जाईल. आधीच कोरोनामुळे घरी आडकून पडलेल्या अनेक कर्मचाऱ्यान मध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परीस्थितीमुळे प्रवाशाच्या सर्वच यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.इच्छा असून सुद्धा कर्मचारी कामवर येऊ शकत नाही. प्रशासनानेजी प्रवासाची सोय केली आहे ती आधिच्याच कर्मचाऱ्याना आपुरी पडत आहे. त्यात कर्मचारी गर्दी करून भरले जातात. गर्दी मुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे, त्यामुळे प्रशासन एकीकडे घरात बसण्याची विनंती करीत आहे. आणि दुसरी कडे मुंबई महापालिकेने ५०टक्के कर्मचाऱ्यानी उपस्थित राहावे हे परिपत्रक काढले आहे. जे कर्मचारी मुलुंड,बोरीवली,मानखुर्दच्या पुढे राहतात. अशा कर्मचाऱ्याना प्रवासाची साधने नसल्याने सेवेत उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे कर्मचारी संभ्रमात आहे कराव तरी काय? कामावर येणार तरी कसे असा सवाल कर्मचाऱ्यान मध्ये आहे. आदीच बेस्ट बस मध्ये आपत्काळीन सेवेतील कामगार व कर्मचारी याची गर्दी होत असताना त्यात सामाजिक अंतराचा कोणताही नियम पळताना दिसून येत नाही. जर अनखीन पालिका कर्मचाऱ्याची भर त्यात पडली तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.