प्रतिनिधी.
डोंबिवली – महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असतो. यंदाच्या उत्साहावर कोरोनानं संकट उभ केलं असल्याने नियम आणि अटींचे पालन करून हे उत्सव साजरे केले जात आहे.मात्र गणेशोत्सवाच्या कालखंडात कोरोनाशी दोन हात करत असलेले कोरोना योध्ये आणि रुग्ण मात्र उत्साहापासून दूर राहिले होते.मात्र कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथील असलेल्या एका कोविड हॉस्पिटल मध्ये नाहर या संस्थेने पुढाकार घेत रुग्णांना लाडू मोदकाचा प्रसाद देत गणेशोत्सव साजरा केला आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्णांनी आणि डॉक्टरांनी जल्लोषात आरती सुद्धा केली.
Related Posts