Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
आरोग्य लोकप्रिय बातम्या

पुण्यात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय ५८ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पुणे/प्रतिनिधी – पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या 58 व्या तुकडीचे 112 स्नातक 25 एप्रिल 2024 रोजी एएफएमसीच्या कॅप्टन देवाशिष शर्मा,कीर्तीचक्र संचलन मैदानावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय सशस्त्र सैन्यदलांत दाखल झाले.

डीजीएएफएमएस अर्थात सशस्त्र सैन्यदलांच्या वैद्यकीय सेवांचे महासंचालक आणि आर्मी मेडिकल कॉर्प्सचे वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट दलजित सिंग यांनी या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. वैद्यकीय छात्र (आता लेफ्टनंट) सुशील कुमार सिंह याच्या कमांडमध्ये निघालेल्या दीक्षान्त संचलनाचे डीजीएएफएमएस   सिंग यांनी निरीक्षण केले.

नव्याने सेवांमध्ये दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांनी संपूर्ण समर्पण भावाने देशाची आणि सैन्यदलांची सेवा करण्याचा संदेश अधिकाऱ्यांना  दिला. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

एएफएमसी च्या 58 व्या तुकडीच्या छात्रांनी 2023 च्या हिवाळ्यातील एमयुएचएस परीक्षांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली आणि एकूण एकशे सत्तेचाळीस छात्रांनी पदवी संपादन केली. यामध्ये मित्र देशांच्या पाच छात्रांचाही समावेश होता. सशस्त्र सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवांमध्ये दाखल झालेल्या एकशे बारा छात्रांमध्ये सत्त्याऐंशी पुरुष छात्रांचा आणि पंचवीस महिला छात्रांचा समावेश आहे. अठ्ठ्याऐंशी छात्र लष्करात, दहा नौदलात आणि चौदा हवाईदलात समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.

छात्रांच्या उत्तुंग शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्याचा शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा कमिशनिंग समारंभानंतर पार पडला. ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ आणि ‘कलिंग करंडक’ हे या महाविद्यालयाचे सर्वाधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. यावर्षी फ्लाईंग ऑफिसर आयुष जयस्वाल हे ‘राष्ट्रपती सुवर्णपदकाचे’ तर सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर या ‘कलिंग करंडकाच्या’ मानकरी ठरल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X