Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी थोडक्यात

कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये साजरा करण्यात आला ४१ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – शिस्तबद्ध पडणारी पाऊलं, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण अशा वातावरणात लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची 40 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पाडला. भारतीय सैन्याचा कणा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये हा सोहळा पार पडला. चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या प्रात्यक्षिकाने नाशिककरांच्या डोळ्यांची पारणे फिटले.

गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदींसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते. अशी माहिती मेजर अजय कुमार सूर्य यांनी दिली.

Translate »
X