नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नाशिक/प्रतिनिधी – ‘प्रेसिडेंट ऑफ कलर्स’चा बहुमान प्राप्त असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ४०व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षान्त सोहळा लष्करी थाटात आज पार पडला . प्रशिक्षणार्थी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी संचलन करत वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांना ‘सॅल्युट’ केले. या तुकडीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकांचाही यामध्ये सहभाग असणार आहे. त्यांच्या रूपाने पुन्हा दोन लढाऊ महिला वैमानिक देशसेवेत दाखल होणार आहेत.
चित्ता, चेतक आणि ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण या लष्करी संस्थेकडून दिले जाते. देशभरातील एकूण १५ महिला सैनिकी अधिकाऱ्यांची निवड लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणासाठी संरक्षण खात्याकडून करण्यात आली आहे. यापैंकी दुसऱ्या टप्यातील दोन महिला अधिकाऱ्यांनीसुद्धा यशस्वीरीत्या लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांनाही आज गांधीनगर येथील कैंट्सच्या तळावर गौरविण्यात आलं आहे. २०२२ साली झालेल्या दीक्षान्त सोहळ्यात सहभागी कॅप्टन अभिलाषाच्या रूपाने देशात प्रथमच महिला वैमानिकाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कॅप्टन अनुमेहा त्यागी यांचा ३८व्या तुकडीत दुसऱ्या महिला वैमानिक म्हणून सहभाग होता. या दोन्ही महिला कॅप्टनकडून कुठली ट्रॉफी प्रशिक्षण कालावधीत लक्षवेधी कामगिरीच्या बळावर जिंकली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नायजेरियन सैन्य दलातील एका अधिकाऱ्यानेही भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसोबत लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे धडे गिरविले आहेत. त्यांचाही या तुकडीच्या संचलनात सहभाग होता. सुमारे २० ते २२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी वैमानिकांकडून पूर्ण केले जाते. यानंतर दीक्षान्त सोहळ्यात वरिष्ठ लष्करी अधिकारी त्यांना मोठ्या सन्मानाने ‘एव्हिएटर विंग्स’ प्रदान करतात. हा दीक्षान्त सोहळा प्रत्येक प्रशिक्षणार्थीसाठी अविस्मरणीय असाच असतो.