ठाणे/प्रतिनिधी – दुर्गम भागातील नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विधी सेवा शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कायद्याविषयी जागरूकता निर्माण करतानाच तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महामेळावा उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांनी आज शहापूर तालुक्यातील सापगाव येथे केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सापगाव येथे विधी सेवा शिबिर तसेच विविध शासकीय योजनांचा महामेळावा घेण्यात आला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती सय्यद बोलत होते. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिनेश सुराणा, जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ एन. के. ब्रम्हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
न्यायमूर्ती सय्यद यावेळी म्हणाले, यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. तळागाळातील नागरिकांना आपल्या अधिकाराची जाणीव करून देण्याकरिता विधी सेवा शिबिराचा उपक्रम मोहीम स्वरूपात राबविला जात आहे. दुर्गम भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्यसुविधा मिळाल्या पाहिजेत असे स्पष्ट करताना न्या. सय्यद म्हणाले प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि अधिकाराची जाणीव करून देणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या महामेळाव्याचा उपयोग होतो असे त्यांनी सांगितले. शासकीय योजनांपासून कुठलाही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही न्यायमूर्ती सय्यद यांनी केले.विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय आणि कायद्याविषयक जागरुकता आणण्यासाठी विधीविषयक माहितीबरोबरच शासकीय योजनांची माहिती आणि प्रत्यक्षात लाभ यांची सांगड घालत एकाच छताखाली हा उपक्रम असल्याचे न्यायमूर्ती सय्यद यांनी सांगितले.
न्यायाधीश श्री. पानसरे यावेळी म्हणाले, कायदेविषयक साक्षरता अभियान सध्या राबविण्यात येत असून विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना आपल्या न्याय हक्काची जाणीव करून देण्याकरिता हे शिबिर घेण्यात येत आहे. आदिवासी बांधवांना कायद्या विषयक माहिती मिळावी त्याच बरोबर शिक्षण, आरोग्य, जमीन विषयक कायदे या संदर्भात विधी सल्ला देण्याचे काम प्राधिकरणामार्फत केले जात आहे. आदिवासी बांधवांचा विकास होण्याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या बांधवांपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहनही न्या. पानसरे यांनी केले. तालुका, जिल्हा आणि राज्य या तीनही स्तरावर विधी सेवा प्राधिकरण असून या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मोफत विधी सल्ला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तळागाळातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून या विधी सेवा शिबिर तसेच योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने शहापूर सारख्या दुर्गम ठिकाणी न्याय मंदिर आल्याची भावना जिल्हाधिकारी श्री.त नार्वेकर यांनी व्यक्त केली. शासकीय सेवांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वासही श्री. नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला.विधी सेवा प्राधिकरणाचे राज्य सचिव श्री. सुराणा यांनी प्रास्ताविक केले. संविधानाने प्रत्येक नागरिकांना मोफत विधी सल्ल्याचा अधिकार दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्या माध्यमातून प्राधिकरणामार्फत नागरिकांना विधी सल्ला देतानाच लोक अदालत आयोजित करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध शिबिरे आयोजित करून बालकांचे अधिकार, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी कायदा आदीबाबत कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून जाणीवजागृती केली जात आहे. सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना कायद्या विषयक सेवेसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी न्यायमूर्ती सय्यद यांच्या हस्ते मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शुभारंभ करण्यात आला. त्यांनी मोबाईल मेडीकल युनिट ची पाहणी करत तेथील डॉक्टरांशी संवाद साधला. या मेळाव्याच्या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध विभागांनी योजनां विषयक माहिती आणि मार्गदर्शन करणारे स्टॉल मांडले होते. त्याला देखील न्यायमूर्ती सय्यद यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली. जनधन योजने अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या औषधी वनस्पती, कृषी विभाग, वारली चित्र चित्रशैली, शासकीय दाखले देणारा महसुल विभागाच्या स्टॉलवर न्यायमूर्तींनी भेट देऊन माहिती जाणून घेतली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी न्यायमूर्ती सय्यद यांच्या हस्ते आदिवासी विकास, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, वन विभाग, कृषी, माविम, परिवहन या विभागांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र, साहित्य तसेच शिधापत्रिका, वनपट्टे, मोफत सातबारा आदींचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, भिवंडी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे, तहसिलदार श्री. तवटे, शहापूरचे तहसिलदार श्रीमती सूर्यवंशी, यांच्यासह न्यायिक अधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, वकील आदी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मंगेश देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Related Posts
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
भारतीय रेल्वे आणि भारतीय टपाल विभागाची ‘संयुक्त पार्सल सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय टपाल विभाग…
-
भारत आणि गयाना दरम्यान हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने…
-
आता वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची नोंदणी प्रेस सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि प्रसारण…
-
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा विधेयक, २०२३ चा प्रस्ताव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - माहिती आणि…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
सोलापूर वळसंग येथे न्या. सय्यद यांच्या हस्ते विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन
सोलापूर/प्रतिनिधी- घटनेने भारतीय नागरिकांना दिलेल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत करणे…
-
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मुंबई /प्रतिनिधी - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी…
-
पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणणारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माध्यम आणि संवादक परिषद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - फरिदाबादच्या टीएचएसटीआय…
-
केडीएमसीने १०७ सेवा केल्या अधिसूचित,नागरीकांना मुदतीत दर्जेदार सेवा मिळणार
DESK MARATHI NEWS ONLINE. कल्याण/प्रतिनिधी - शासनाने अधिसुचित केलेल्या 58…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
भिवंडीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदारांनी घेतली राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांची भेट
मुंबई /प्रतिनिधी - भिवंडीतील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तसेच शहरातील एकमेव स्व. इंदिरा…
-
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
खादी आणि ग्रामोद्योग आयोगात पद भरती
पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८) शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा…
-
त्री- सेवा कमांडर्स परिषद -२०२३ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - हवाई…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
कल्याणात अत्यावश्यक सेवा वगळता बंदची हाक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा…
-
तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर
प्रतिनिधी. नवी दिल्ली - देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज…
-
भारतीय सिनेमा आणि भारताची सौम्यशक्ती या विषयावर ३ आणि ४ मे रोजी चर्चासत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयसीसीआर म्हणजेच सांस्कृतिक संबंधविषयक…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगामार्फत…
-
ऑनलाइन पोर्टल मुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ सुलभरीत्या मिळण्यात होणार मदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून …
-
महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. नवी दिल्ली - अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय…
-
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचाराला चालना
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकार देशातील…
-
मुंबई आणि राजस्थानात इन्कमटॅक्स विभागाच्या धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इन्कमटॅक्स विभागाने 16.06.2022…
-
राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने मुंबई, औरंगाबाद…
-
भारतीय नौदलाचा तोफा आणि क्षेपणास्त्र परिचालन परिसंवाद संपन्न
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या…
-
तापी आणि पूर्णा नदीच्या पुरामुळे पिकांचे नुकसान
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - तापी व…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाने ओला, उबर व…
-
रोग निदान आणि उपचारासाठी नवपद्धती ‘जिमोनिक्स, झेब्राफिश
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - रोग निदान व उपचारासाठी जिनोमिक्स,…
-
कोरोनाग्रस्त कुटुंबियांची सेवा करण्यासाठी सरसावली तरुणाई
कल्याण प्रतिनिधी - पहिल्यापेक्षा अधिक भयंकर असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये…
-
सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था…
-
मुंबईत एनएफडीसी आणि अर्जेंटिना चित्रपट महोत्सवाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) एनएफडीसी आणि…
-
डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
-
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाच्या बाजारपेठेत विक्रीला जाणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतात उत्पादित केळी आणि…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…