नवी दिल्ली/प्रतिनिधी – हळद, बेदाणा, मसाले, चामड्याची उत्पादने, बांबू फर्निचर, पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल आदी महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगती मैदान येथील हॉल क्र. २ मध्ये राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची विविध उत्पादने व हस्तकला उत्पादनांनी सज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन)४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन केले असून येथे भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी येथील लालासो भोसले यांचा हळदी, बेदाना आणि मिरचीपूड ही उत्पादने असलेल्या स्टॉलवर ग्राहकांची एकच गर्दी दिसते. रास्त दरात गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचा आनंद या स्टॉलहून उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बोलून दाखवला. या स्टॉलचे प्रमुख लालासो भोसले गेल्या चार वर्षांपासून या मेळाव्यात येत आहेत व राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीमुळे देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचत असल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले.
कोल्हापुरी, शाहू व कुरुंगवाळी चपलांचा बोलबाला
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेदच्या बचतगटांच्या स्टॉलवर कोल्हापुरी चपलांसह विक्रीसाठी असलेली वैशिष्ट्यपूर्ण पादत्राणे, वारलीपेंटींग ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. कोल्हापूर येथील सिध्दाई महिला बचतगटाच्या ‘आम्ही कोल्हापुरी चप्पल’ या स्टॉलवर टिपिकल कोल्हापुरी चपलांसह कापसी, कुरुंगवाळी, मोजेसेफ, शाहू चप्पल, पेपर कापसी ही पादत्राणेही ग्राहक मोठ्या उत्साहाने खरेदी करीत आहेत. ‘सिध्दाई महिला बचतगटा’च्या प्रमुख सीमा कांबळे यांनी सांगितले, २०१६ पासूनच त्या राज्य शासनाच्या ‘उमेद’ अभियानासोबत जोडल्या गेल्या असून भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात त्या प्रथमच सहभागी झाल्या. जागतिक दर्जाच्या या मेळाव्यात सहभागी झाल्याने एक चांगला अनुभव गाठिसी येत असल्याचा व चोखंदळ ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचत असल्याचा आनंदही त्यांनी बोलून दाखवला.
माविमच्या ‘क्रांतीज्योती वारली पेंटींग युनिट’चा वारलीबॅग व गारमेंटच्या स्टॉलवरील आकर्षक उत्पादनेही ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. वारली पेंटींग युनीटच्या रीना जाधव आणि शमसुन्नीसा इकबाल खुटे यांच्या चेहऱ्यावरील आनंदही बोलका आहे. माविमचाच ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत असलेला चंद्रपूर येथील कारपेट क्लस्टरचा स्टॉल व येथील कारपेट वॉल फ्रेमिंग, बांबुकव्हर डायरीही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेंतर्गत येथे गडचिरोली जिल्ह्यातील मोशीखांब येथील प्रतिक्षा हॅण्डीक्रॉफ्टचा स्टॉल आहे, या स्टॉलच्या प्रमुख प्रतीक्षा शिडाम यांनी कुशन कव्हर,लाईट लँप, मॅक्रम, वारली पेंटींग जाकेट आदि उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. खादी ग्रामोद्योग महामंडळांशी संलग्न औरंगाबाद येथील शुभम लेदर अँड लेदर फोम इंडस्ट्रीनेही चामड्याची आकर्षक उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. या स्टॉलचे प्रमुख गजानन पुरुषोत्तम हे २००८ पासून खादी ग्रामोद्योग महामंडळासोबत जोडले गेले असून प्रथमच या व्यापार मेळाव्यात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील ‘वुडीग्रास’ हा बांबू फर्निचरचा स्टॉलही महाराष्ट्र दालनास भेट देणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांचे लक्षवेधून घेत आहे. वुडीग्रास हा उपक्रम सुरु होवून केवळ एक महिना झाला असून अल्पावधीतच त्यास या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आपले उत्पादन प्रदर्शीत व विक्री करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील आठ उद्योग समूहांची (क्लस्टर) उत्पादने येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत व या सर्व स्टॉल्सला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र दालनात राज्य शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. दालनात प्रवेश करताच आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमूठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली, ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट हे दालनाला भेट देणा-या ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिका, औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉल, महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्रही (मैत्री) या दालनास भेट देणा-या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींना आकर्षित करीत आहेत.
Related Posts
-
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा
मुंबई, दि. 29 : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे…
-
भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
बनावट पावत्या देत विज ग्राहकांची फसवणूक, भामटा गजाआड
कल्याण प्रतिनिधी- वीजबिल भरल्याची बनावट पावती देऊन रक्कम परस्पर हडपून…
-
परदेशी व्यापार धोरणाची मर्यादा सहा महिने वाढवली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारला निर्यात प्रोत्साहन…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर रविवारी आयोजित…
-
ई संजीवनी -भारत सरकारची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
उन्हापासून प्राण्यांच्या बचावासाठी प्राणीसंग्रहालयात खास व्यवस्था
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - सध्या सर्वच ठिकाणी…
-
हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - राष्ट्रीय गुंतवणूक…
-
आयटीबी बर्लिन व्यापार मेळ्याव्यात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक पातळीवर चालना…
-
जपान-भारत सागरी सराव २०२२ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. बंगाल/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या…
-
लायन्स क्लबच्या माध्यमातून भारत को ऑपरेटिव्ह बँकेत आरोग्य शिबीर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणातील…
-
ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या ‘महाराष्ट्र दिन’
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध अशी आहे. उद्या…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
India vs भारत" वादावर प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - "India vs…
-
परस्पर संरक्षण सहकार्यासाठी ब्राझील लष्कर कमांडर भारत दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ब्राझिलियन…
-
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्रातील स्थानिक उत्पदनांची मोठी मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोल्हापूरचा मसाला,…
-
कल्याणात साकारला प्रतिकात्मक दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा
प्रतिनिधी/संघर्ष गांगुर्डे - नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजधानीत सुरु असलेल्या भारत…
-
वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रवाशांची पसंती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रातून धावणाऱ्या चारही वंदे…
-
भारत कृषी महोत्सवात गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षणाचा केंद्र बिंदू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - स्वर्गीय आमदार भारत…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यंदाच्या 41 व्या…
-
भारत-मलेशिया यांच्यातील संयुक्त लष्करी युद्धसराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि मलेशियातील…
-
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची विजयी पताका
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्वित्झर्लंडमध्ये झ्युरिक येथे 16…
-
१४ नोव्हेंबर रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले…
-
भारत-इंडोनेशिया समुद्र शक्ती-२३ युद्धसरावाचा समारोप
नेशन न्यूज मराठी टीम नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत-इंडोनेशिया या देशांमधील…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी दुसऱ्या फेरीची चर्चा पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारत-यूके मुक्त व्यापार…
-
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या मंगरूळ गावातील आंतरराष्ट्रीय…
-
भारत जोडो अभियानातील कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीचा प्रचार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - देशभरात काही महिन्यांपूर्वी…
-
४१ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र असणार ‘भागीदार राज्य’
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘महाराष्ट्र दालन’ भारतीय…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय…
-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर
प्रतिनिधी. मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास…
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
साखर निर्यातीत भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- साखर हंगाम (ऑक्टोबर -सप्टेंबर) 2021-22 मध्ये, देशात 5000 लाख…
-
बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बचत गट, लघु…
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल…
-
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - वर्ल्ड मिडिया ॲण्ड…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव सुरु
नवी दिल्ली/प्रतिनिधी - पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…