प्रतिनिधी.
डोंबिवली – वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी च्या वतीने २६ नोव्हेंबर २०२० रोजी ७१ वा संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे भोसले, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना फ़ुलपुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त भारताचा पवित्र ग्रंथ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रत साहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, रामनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांबळे, गोपनीय विभाग डोंबिवलीचे सुनील खैरनार, बालाजी शिंदे, वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव (डोंबिवली) यांना वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने देण्यात आल्या.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी या दिनी जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी केला होता तो परतुन लावताना जे पोलीस अधिकारी शहिद झाले त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी सुरेंद्र ठोके शहराध्यक्ष डोंबिवली, मिलिंद साळवे क.डो जिल्हा संघटक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था डोंबिवलीचे अध्यक्ष रविकिरण मस्के, भारतीय बौद्ध महासभा डोंबिवली शहर सरचिटणीस साहेबराव वाघ, राजु काकडे, नंदु पाईकराव, अर्जुन केदार, राहुल पांडविर, बाजिराव माने, शांताराम तेलंग, अशोक गायकवाड, रामकिसन हीगे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.