Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
क्रिडा चर्चेची बातमी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त रेशीम शेतीची केली पाहणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बीड/प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील रुई गावात हे रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तब्बल बाराशे एकर शेत जमिनीवर रेशीम शेती (Sericulture) केली जाते. परंतु यंदाच्या दुष्काळामुळे संपूर्ण बाराशे हेक्टर शेत जमिनीवरील रेशीम शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. याच गावातून कोट्यावधी रुपयांच्या रेशीमची उलाढाल होते. मात्र यंदाच्या दुष्काळाने रेशीम शेतीला फटका बसला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बीड जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील रुई गावात दुष्काळी भागाची पाहणी केली. दरम्यान बांधावर पाहणी करण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी शेतकऱ्याच्या शेतातूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना फोन लावला. दोघांचेही फोन नॉट रिचेबल होते. शेतकरी संकटात असताना मंत्री मात्र नॉटरीचेबल असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. सरकार या शेतकऱ्यांना दाबण्याचे काम करत आहे. भाजप प्रणित सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Translate »
X