नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशाची जी माती केली, ते दाखवून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षातर्फे 3 सप्टेंबर पासून जनसंवााद पदयात्रा सुरू होत आहे. असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे म्हणाले. ही यात्रा प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहराच्या भागात जाणार आहे.
नरेंद्र मोदीच्या सरकारने संविधानिक व्यवस्थेला संपवलं, या देशाला बेरोजगारांचा देश बनवला, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला परावृत्त केलं. महागाई वाढवली, मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. यांच्यातील एकाने सांगितलं डॉ. बाबासाहेबांनी घटना लिहिलीच नाही अशा थोर नेत्यांचे अपमान करण्याचा पाप हे सरकार करते आहे. या सगळ्या गोष्टीची जनतेमध्ये चीड आहे या त्यांच्या भावना समजून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. काँग्रेस ही देशाच्या संविधानिक व्यवस्थेला न्याय देणारी पार्टी आहे त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या पाठी उभे राहण्याचा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या सरकारच्या योजना कशा बोगस आहेत आणि जनतेला कसं लुटून व्यापारीदृष्टीनं व्यापारी लोकांना मोठं केलं आहे. नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना जाण्यास बंदी होती , मात्र ते प्रधानमंत्री झाल्यावर अमेरिकेत गेले आणि त्यांनी तिथे सांगितलं की मै व्यापारी हु आणि व्यापारी कसा जनतेला लुटतो याचा प्रत्यय जनतेला येत आहे. डीझेल, पेट्रोलवर शेतकऱ्यांच्या नावाने कर घेतला जातो. वेगवेगळ्या मार्गाने खरबो रुपये जमा केले जातात. अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटी मध्ये कसा केला जातो हे कॅगचा रिपोर्ट मधून समोर आलं ज्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहे, त्यांचं सरकार आणि मंत्री कसे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे पटोले म्हणाले.
कृत्रिम महागाई वाढवली आहे, शेतकऱ्यांना फसवलं जात आहे या सगळ्या गोष्टीची पोलखोल करणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात येड्याची सरकार आहे, त्याची पोल उघडकीस आणून भाजप विरोधात जो राग आहे. तो राग जनतेपर्यंत पोहोचून त्यांची सत्ता उलटवून लावणं हा पदयात्रेचा उद्देश असेल. आता त्यांच्याजवळ कुठली चेहरे बाकी राहिले नाही भाजप जवळचे सगळे चेहरे संपलेले आहे. भाजपचा खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे त्यामुळे मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे आणले त्यावर कोणीही विश्वास करायला तयार नाही असे टीकास्त्र भाजपवर पटोले ह्यांनी सोडले.