महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
मुख्य बातम्या राजकीय

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसैनिकांमध्ये संभ्रम,डोंबिवलीतील पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. शिवतीर्थ येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मंगळवारी बिनशर्त पाठींबा दिला. “लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटले होते.” ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एकीकडे मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात जल्लोषाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मनसेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राज ठाकरेंचा या निर्णयाला काही वेळच झाला आहे तोवर आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात केली आहे.

डोंबिवलीतील मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते यांच्यासह इतर सात जणांनी राजीनामा दिला आहे. मिहिर दवते म्हणाले “आम्ही 2006 पासून मनसेत कार्यरत आहोत. 2016 पर्यंत पक्ष संघटना वाढत गेली त्यात पूर्णपणे आमचा हातभार होता. दोन वेळेस निवडून आलेल्या नगरसेविका मंगलाताई सुळे यांना आम्ही 2010 साली हरवले. पण गेल्या काही वर्षात राज ठाकरे यांच्या ज्या बदलत्या भूमिका आहेत त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढतोय. कार्यकर्त्यांमध्ये दुफळी वाढत चाललेली आहे, कार्यकर्त्यांना तोंड देणे कठीण होत आहे. मनसेत आम्ही राज साहेबांमुळे आलो होतो पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे मी आणि मनसेच्या काही पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिला. मनसेच्या सोशल मिडिया ग्रुपवर हा राजीनामा आम्ही दिला.”

राज ठाकरे यांनी मोदींना देलेल्या पाठिंब्यामुळे विरोधी पक्ष तर त्यांच्यावर हल्ला करतच आहेत शिवाय आता मनसैनिकांमध्ये देखील वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यात सुरू असलेल्या एकंदरीत परिस्थितीवरून राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचे विधानसभेच्या निवडणुकीत चांगले-वाईट पडसात उमटू शकतात.

Translate »
×