नेशन न्यूज मराठी टिम.
बुलढाणा/प्रतिनिधी– बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अवैध गुटख्याची वाहतुक करणाऱ्या बोलेरो पिकप वाहनाला ताब्यात घेवून 8 लाख 76 हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याची चिखली पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली आहे. यावेळी बोलेरो पिकप वाहनाच्या चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मध्यरात्री अडीच वाजता चिखली शहरातील संभाजी नगर परिसरात पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना बोलेरो पिकप वाहनालाला थांबविले असता चालकाची हालचाल संशयास्पद आढळून आल्याने बोलेरो पिकप वाहनाची तपासणी केली असता बोलेरो पिकप वाहनामधून 8 लाख 76 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. शिवाय बोलेरो पिकप वाहन जप्त करून गुटख्यासह एकूण 15 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक आरोपी विरोधात चिखली पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या बोलेरो पिकप वाहनाच्या चालकाचे सौरव अशोक अतकरे असे नाव असून तो खामगाव येथील रहिवाशी आहे.