नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी / कल्याण मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका व मुंबई परिसर विपश्यना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महानगर पालिकेतील अधिकारी वर्गासाठी विपश्यना परिचय व आनापान ध्यानसती सराव कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले होते आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग, मुंबई परिसर विपश्यना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या वर्ग-1, वर्ग-2 पदावरील अधिकारी आणि अधीक्षक वर्ग यांच्यासाठी विपश्यना परिचय व आनापान ध्यानसती सराव कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी भाषणात बोलताना आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी विपश्यना साधना आणि भगवान गौतम बुध्द यांच्या उपदेशावर अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर कल्याण आधारवाडी कारागृहाचे अधिक्षक आर.आर.भोसले उपस्थित होते. मुंबई परिसर विपश्यना केंद्राचे अध्यक्ष किर्ती देढीया यांनी कार्यशाळेला सुरुवात केली.
विपश्यनेमुळे मन शांत व संतुलीत राखण्यास मदत होते. यासाठी सर्व अधिका-यांनी विपश्यना शिबीरात सहभागी होवून विपश्यनेची अनुभूती घेणे गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सागितले.
यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना प्रती दिन येणाऱ्या अडचणी आणि त्यामधून बाहेर पडण्याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन विपश्यना आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. सदर समयी उपस्थित अधिकारी वर्गाने सुमारे 14 मिनिट आनापान ध्यानाचा सराव केला.
यावेळी ट्रस्टी संकेत देढीया यांनी विपश्यना वेबसाईट, सोशल मीडिया, लहान मुलांचे कोर्स, टीनेजर कोर्स, 10 दिवसाचे अर्ज कसे भरायचे यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले.