DESK MARATHI NEWS ONLINE.
नागपूर / प्रतिनिधी – केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापुस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आहे. याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे वनस्पती संरक्षण विभाग फरीदाबादचे सल्लागार डॉ. जे पी सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद हे प्रामुख्याने उपस्थित होते. अशी माहिती क्षेत्रीय एकीकृत किड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे संयुक्त संचालक डॉ. ए.के.बोहरिया यांनी दिली.
27सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या एक महिना चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यानांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती बेहरा यांनी दिली . नागपुरातील क्षेत्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रांच्या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश गोवा, गुजरात या पाच राज्यातील राज्यशासनाला कीड व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूरद्वारे शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन करिता यांत्रिक पद्धतीमध्ये सापळ्यांची रचना,रासायनिक नियंत्रणासाठी निंबोळी अर्कासारख्या कीटनाशकाची निवडत्याचप्रमाणे जैविक नियंत्रणासाठी मित्र कीटकांच्या व्यवस्थापनात बाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जात असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांची निवड कशी करावी याबाबत देखील मार्गदर्शन केले जाते .