नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी -रामदेवबाबा यांनी एका कार्यक्रमात महिलांबद्दल विधान करताना रामदेव बाबा म्हणाले कि महिलांनी कोणतेही कपडे परिधान केले तरी त्या सुंदर दिसतात, महिलांनी कोणतेही कपडे परिधान केली नाही तरी त्या सुंदर दिसतात अस विधान करून रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. अशी प्रतिक्रिया रामदेवबाबा यांच्या विधाना नंतर शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.व आपली नाराजी व्यक्त केली.
तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो.
मात्र आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते. असाही त्या म्हणाल्या
योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता त्यांच्या या विधानाने लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते.असे बोलत नीलम गोऱ्हे यांनी आपला निषेध व्यक्त केला.