अमरावती/प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत एकमेकांना जोडून पूरपरिस्थिती व दुष्काळावर मात करीत जिल्हा सुजलाम सुफलाम करणाऱ्या तापी महाकाय पूर्नभरण महत्वाकांक्षी योजना गतीने पूर्ण करण्याबाबत निर्देश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यात दहा मोठ्या व चौदा लहान अशा चोवीस नद्या वाहतात. या सर्वच नद्या मध्यम सपाट भागातून उत्तर दक्षिण वाहतात. जिल्ह्यातील पेढ़ी, पूर्णा, पिली, चंद्रभागा, शहानूर या नद्या तापीला मिळतात तर वर्धा नदी पूर्वेकडे वाहून प्राणहिता नदीला मिळते. असे असले तरी दरवर्षी भुजल पातळी कमी होत असल्याने व काही तालुक्यांमध्ये पाण्याची कमतरता असते तसेच कमी पावसामुळे काही धरणे, बंधारे कोरडे राहतात. जिल्ह्यातील तापी, पूर्णा, पेढी आणि गोदावरी खोऱ्यात वाहणाऱ्या या नद्यांना जोडणाऱ्या योजनेला जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या मार्गदर्शनात गती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीला दर २५ वर्षानंतर पूर येत असल्याची आतापर्यंतच्या नोंदी आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुके ड्रायझोन असून चांदूरबाजार व अचलपूर तालुके अतिशोषित आहेत. भातकुली, दर्यापुर, अंजनगावसुर्जी तालुके खारपान पट्टयातील आहेत. केंद्र सरकारच्या जलशक्ति अभियानाअंतर्गत या तालुक्यांची निवडही झालेली आहे, मात्र यावर पाहिजे त्या गतीने काम होत नाही. परिणामी जिल्हयात दुष्काळाचे सतत सावट असते. जिल्हयात ७० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक संत्रा लागवडखाली आहे. जिल्हयात वेळेवर पाऊस येत नसल्याने संत्रा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली हे तीन तालुके खारपाणपट्ट्यातील आहेत. जिल्हयातील सहाही नदीचा परिसर मध्यम सपाट उंचीच्या भागाचा आहे. सर्वच नद्यांचे पाणलोट क्षेत्र भिन्न असल्याने एकाच वेळी सर्वच नद्यांना पूर येत नाही. शिवाय तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात तापीचे पाणी अचलपुर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे.
पश्चिमवाहिनी पेढी, पूर्णा, पिली, शहानूर, चंद्रभागा या नद्या पुढे तापीला तर पूर्ववाहिनी वर्धा ही प्राणहिता व नंतर गोदावरीला मिळते. पूर्वेकडील राजुरवाडी (ता. तिवसा) येथील वर्धा नदी व पश्चिमेकडील शहानूर नदी (ता. अचलपूर) यांचे एका आडव्या रेषेत सर्वात कमी अंतर आहे. या रेषेला छेदून पेढी, पूर्णा, पिली व चंद्रभागा नद्या वाहतात. त्या एकसमान जलपातळीच्या कालव्याने एकमेकांना जोडल्यास सर्व नद्या आपापल्या क्षमतेने किंवा बारमाही समान वाहून पूरपरिस्थितीत नियोजन होऊ शकते.
परिणामी अतिशोषित व ड्रायझोन तालुके आणि खारपाणपट्ट्यातील अंजनगावसुर्जी, दर्यापूर व भातकुली अशा सहा तालुक्यांना फायदा होऊ शकतो. जलशक्ती अभियानांतर्गत व्यवहार्यता तपासणीसाठी सकारात्मक शास्त्रोक्त अभ्यासाची आवश्यकता असून या अनुषंगाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिका-यासोबत चर्चा करुन प्रकल्पाद्वारे अचलपूर मतदार संघासह अमरावती जिल्ह्याला या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकल्पाचा लाभ
जिल्ह्यातील नद्या वर्धा, पूर्णा, सपन, चंद्रभागा, शहानूर, शक्ती, पेढी, गडगा, बेंबळा, तापी (मोठ्या), चारगड, भुलेश्वरी, कोल्हाड, भानामती, नाद, विदर्भा, भोगवती, रायगड, बेला, जिनवा, दाटफाडी, पाक, चुडामन, बिच्छन, बोट, वादी, बुटी, बोदील, सिपना, खापरा, स्वारू, वान, डोलारा, देवना (लहान) संत्राबागांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) वरुड -२१,३४६, चांदूरबाजार – ११.१९६, मोर्शी ११,२२५, तिवसा – ३०७५, अचलपूर – ११,१९७, अंजनगावसुर्जी – ५,४१२ एवढे आहे. तापी महाकाय पुनर्भरणची जोड प्रस्तावित तापी महाकाय पुनर्भरण योजनेच्या डाव्या कालव्याद्वारे तापीचे पाणी इच्छापूर येथून अचलपूर तालुक्यात येईल. त्याला संभाव्य कालवा जोडला जाऊ शकते.
असे आहे नियोजन
वर्धा नदीवर राजुरवाडीपासून शहानुर नदी ही सर्वात कमी अंतराच्या एका रेषेत एका जलपातळीत जोडल्यास त्याला छेदून जाणाऱ्या या जिल्ह्यातील सहा नद्या या बारमाही वाहु शकतात, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, खारपाण क्षेत्रात गोडपाणी बारमाही उपलब्ध होऊ शकते. ड्रायझोन तालुक्यात व अतिशोषित तालुक्यात भूगर्भीय जल पातळीत वाढ होऊ शकते. धोक्यात आलेले संत्रा क्षेत्र व संत्रा उत्पादक कोरडवाहू शेतकरी संकटापासून वाचविले जाऊ शकतात. या प्रकल्पासाठी वर्धा (राजुरवाडी) ते शाहनूर (अंजनगावसुर्जी) एवढी लांब व केवळ 100 मीटर रुंद जमीन संपादित करावी लागेल. त्यापैकी 60 मीटर रुंद कालवा, दोन्ही बाजूला प्रत्येकी 15 मीटर मातीची भींत तसेच भिंतीपासून प्रत्येकी 5 मीटर संरक्षित क्षेत्र ठेवून प्रकल्प साकारला जाऊ शकतो. तापी नदीचे पाणी अचलपूर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा शहानूर नदीजोड प्रकल्प राबविल्यास संपूर्ण परिसर ‘ सुजलाम सुफलाम ‘ निश्चित होऊन शेतकऱ्यांची “आजीवन” आर्थिक भरभराट होईल. जिल्हयातील लाखो नागरिक शेतकरी यांच्या हिताचा महाकाय नदीजोड प्रकल्प “सकारात्मक दृष्टिकोणातून राबविण्यासाठी आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रकल्पाचे स्वरूप
मौजे खारीया, घुटीघाट, ता धारणी येथे वळण बंधारा बांधकाम करणे, मुख्य बंधा-यांची लांबी 1.28 किमी बंधा-यांची उंची 22 मीटर, 15 x12 मीटरचे 22 दरवाजे. प्रकल्पाची एकंदर किंमत 10,700 कोटी, बुडीत क्षेत्र मध्यप्रदेश 1495 हेक्टर व महाराष्ट्र 2288 हेक्टर (खाजगी 1621 हे. + शासकीय 338 हे + 323 हे.+ वनजमीन, पाणीसाठा 235.60 दलघमी, पाणी वापर महाराष्ट्र 19.37 टी.एम.सी व म.प्र. 11.76 टी एम सी, या योजनेतून पूर्नभरणाव्दारे अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष फायदा महाराष्ट्रातील 2,34,706 हेक्टर व म.प्र.तील 1,23,082 हेक्टर असे एकुण 3,57,788 हेक्टर ला होणार आहे. वळन बंधात्यावरुन उजवा कालवा 221 किमी (म.प्र.करीता) व डावा कालवा धारणी ते इच्छापूर व जोडबोगदा ते अचलपूर एकुण 276 किमी प्रस्तावित आहे. सदर योजनेचे सर्व्हेक्षण व अन्वेषण जवळपास पूर्ण झालेले असनू त्वरीत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही गाव बाधीत होत नसून पूर्नवसनाची आवश्यकता राहणार नाही यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सिंचन क्षमतेमध्ये वाढ
पावसाळयात तापी नदीचे पुराचे पाणी म.प्र. तसेच डाव्या कालव्याव्दारे महाराष्ट्रातील धारणी, अचलपूर पर्यंत नदी नाल्यात सोडून, भुमीगत बंधारे, गॅबीरीयन बंधारे, पुर्नभरण विहीरी, पुर्नभरण दंड, (शाफर) इंजेक्शन वेलस व साठवन बंधारे बांधुन पुर्नभरण करुन खोल गेलेली भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावणे व निर्माण होणात्या पाणी साठयाव्दारे सिंचन क्षमता वाढविता येतील.
Related Posts
-
सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
कामगार गुलाम नाही, प्रसंगी त्याच्या सन्मानासाठी लढावे लागले तरी लढू - राज्यमंत्री बच्चू कडू
प्रतिनिधी. मुंबई - कामगार हा कामगार आहे. तो गुलाम नाही.…
-
सभेच्या मैदानावरून राणा दाम्पत्य व बच्चू कडू आमने-सामने
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - अमरावतीत प्रहार जनशक्ती…
-
२० ते २१ तारखेपर्येंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल - आमदार बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - काल सत्ता संघर्षाचा निकाल…
-
शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज…
-
राणा दांपत्य हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे - बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - विदर्भात कॉंग्रेसची…
-
अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर १ हजार घरकुले साकारणार - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी . अमरावती - गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे,…
-
रतन इंडिया’च्या कामगारांचे वेतन तत्काळ अदा करा - कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
प्रतिनिधी. अमरावती - नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर कंपनीच्या कामगारांचे…
-
अतिरिक्त फी आकारणाऱ्या शाळांवर फौजदारी दाखल करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
नागपूर/प्रतिनिधी - कोरोना काळात शाळा बंद असूनही अतिरिक्त बाबींसाठीचे शुल्क…
-
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते वीटभट्टी कामगारांना स्मार्ट कार्डचे वितरण
प्रतिनिधी अमरावती - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाव्दारे कामगारांसाठी 19 प्रकारच्या…
-
धर्म आणि जातीच्या आड आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये-बच्चू कडू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या…
-
संत गाडगेबाबांच्या दशसूत्री प्रसारासाठी राज्यभर फिरणार संदेशरथ,मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी. अमरावती - अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी, तसेच समाजजागृतीसाठी…
-
तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त
मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान…
-
परदेशी व्यापार धोरणाची मर्यादा सहा महिने वाढवली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारला निर्यात प्रोत्साहन…
-
ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी…
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या…
-
दिवा भागासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील दिवा…
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित
नेशन न्यूज मराठी टीम. मुरबाड/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना…
-
ठेका रक्कम भरण्यास मत्स्य व्यावसायिकांना सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक…
-
सहा वर्षाच्या चिमुकालीची नवरा-नवरी सुळक्यांवरून झिप्लायनिंग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - इतिहासात पहिल्यांदाचं नवरा-नवरी या…
-
भारतीय तटरक्षक दलाने केरळातून सहा भारतीयांसह इराणची बोट घेतली ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक…
-
कल्याणात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/प्रतिनिधी - केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या…
-
भाजपने सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, आ. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/DE2_c7qvBkc?si=1TalXyMi8vYJdfXw सोलापूर/प्रतिनिधी - गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क…
-
सरड्यापेक्षा लवकर रंग बदलतात,बच्चू कडूचे राणांवर टीकास्त्र
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/U2L1vupIwDM?si=YFsYCJkP3uLgyBuh अमरावती/प्रतिनिधी - नवनीत राणा…
-
नौटंकी करून वोट मिळणार नाही,रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल, सहा हजार पदे लवकरच भरणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे…
-
संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज- पालकमंत्री ना. बच्चू कडू
प्रतिनिधी. अकोला - कोरोना चे संक्रमण हा अभूतपुर्ण अशा संकटाचा…
-
सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीला कल्याणात बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Dum3ki5mzMU?si=BkaX9L83kX0LrOAI कल्याण/प्रतिनिधी - मध्य प्रदेश…
-
‘जागतिक कौशल्य स्पर्धा – २०२४’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - जागतिक कौशल्य स्पर्धा…
-
राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर…
-
नांदेड-पुणे रेल्वेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. जालना- मराठवाड्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून राज्यातील महत्वाच्या रेल्वे…
-
अयोध्येसाठी जाणाऱ्या ट्रेनला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दाखवला हिरवा झेंडा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - केंद्रीय पंचायत राज…
-
होमगार्डसना कामावर सामावून घेण्याबाबत आणखी एक संधी- गृह राज्यमंत्री सतेज पाटील
मुंबई/प्रतिनिधी - विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्डसना)…
-
येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा – नगरविकास विभागाचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या…
-
भिवंडीत गोदाम इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर सहा जखमी
प्रतिनिधी. भिवंडी -भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम…
-
सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस-आरोग्यमंत्री
मुंबई/ प्रतिनिधी - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी…
-
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ – अर्ज करण्याची अंतिम मुदत २ मार्चपर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - युवकांना राज्य शासनासोबत काम…
-
तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा पालकमंत्री ना. बच्चू कडू
प्रतिनिधी. अकोला -कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट या सारख्या शहरात…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री…
-
संपर्क शोधाचा कालावधी कमीत कमी करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
प्रतिनिधी . अकोला - अकोला जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भावाला…
-
जालना ते पुणे रेल्वेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ
नेशन न्युज मराठी टीम. जालना - जालना ते पुणे व…
-
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून वीज टॉवरबद्दल शेतकऱ्यांना मिळणार जादा मोबदला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील…
-
जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या आदेशाला स्थगिती वनमंत्र्यांच्या प्रयत्नाने कार्यवाही थांबली
प्रतिनिधी . यवतमाळ - जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपु-या असल्या तरी…