महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी देश

ई कोर्ट प्रकल्पांतर्गत संगणकीकरण आणि वाइड एरिया नेटवर्क कनेक्टिव्हिटी

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – देशभरातील सर्व जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालय संकुलांना OFC, RF, VSAT सारख्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून वाइड एरिया नेटवर्क (WAN) प्रकल्पाच्या माध्यमाने जोडण्याच्या उद्देशाने ई  कोर्ट  ( eCourts ) हा प्रकल्प आहे.. मार्च 2023 पर्यंत, 2992 साइट्सपैकी 2976 साइट्स 10 Mbps ते 100 Mbps बँडविड्थ स्पीड सह (99.5% साइट्स पूर्ण ) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.  देशभरातील न्यायालयांमध्ये डेटा कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे  eCourts प्रकल्पाचा कणा आहे.

eCourts प्रकल्पांतर्गत अनेक न्यायालये दूरवरच्या दुर्गम भागात आहेत, त्यांना तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेली साईट्स (TNF) असे म्हणतात, जिथे संवाद केबल वापरता येत नाही. RF, VSAT, सबमरीन केबल सारख्या पर्यायी माध्यमांचा वापर करून साइट्स जोडल्या जात आहेत. विविध हितधारकांशी समन्वय साधून, विभागाने 2019 मधील एकूण 58 TNF साइट्सची संख्या  2022 मध्ये कमी करण्यात यश मिळवले आहे . परिणामी, सरकारच्या तिजोरीतील  95.45 कोटी रुपयांची बचत झाली  आहे. या  साइट्ससाठी कार्य आदेश जारी करण्यात आले आहेत.  कोविड-19 परिस्थितीमध्ये, या WAN कनेक्टिव्हिटीने उत्तम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा तसेच  सुलभ न्यायप्रक्रिया सुनिश्चित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×