प्रतिनिधी .
भंडारा – १ मे पासून धान खरेदी सुरु करण्याचे शासनाचे निर्देश असतांना आज महिना झाला तरी धानाची खरेदी पूर्ण झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांची अडचण होत आहे. टाळाटाळीचे कारण सांगून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही गंभीर बाब आहे. पावसाळा सुरु होण्यास फक्त आठ दिवस राहिले आहेत, तत्पूर्वी जिल्हयातील सर्व धान खरेदी पूर्ण करून शेतकऱ्यांना चुकारे देण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हयातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हयात एकूण 90 धान खरेदी केंद्र मंजूर असून फक्त 45 धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. याचा खुलासा सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्याचा फायदा कसा होईल याचा विचार करुन शेतकऱ्याचे धान वेळेतच खरेदी करण्यात यावे. धानाचे मिलींग करुन धान खरेदीला गती देण्यात यावी. १ मे पासून धान खरेदी सुरु करुन आज महिना झाला तरी धानाची खरेदी पूर्ण झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाही. ही गंभीर बाब असून जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करण्यात येणार नाही. पावसाळयापूर्वी धान खरेदी झाली नाही तर आधीच लॉकडाऊनमूळे अडचणीत सापडलेला शेतकऱ्यास आणखी संकटात टाकू नका, असे ते म्हणाले.
जिल्हयात 14 हजार 814 शेतकऱ्यांना 11 कोटी 38 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील 7 हजार 183 शेतकऱ्यांना 29 कोटी 56 लाखाचे कर्ज मिळणे बाकी आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना मधील 8 हजार 848 शेतकऱ्यांना 26 कोटी 9 लाख 58 हजार रुपयांचे कर्ज माफी अजून व्हायचे आहे, त्यामुळे उद्दिष्ट वाढणार आहे असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक संजय बरडे यांनी सांगितले. 30 जून पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहिजे, असे श्री. पटोले म्हणाले.
जिल्हयाला 260 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 133 कोटी रुपये कर्ज वाटप 28 हजार 28 शेतकऱ्यांना करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे कर्ज वाटपास उशिर झाला असे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महाव्यवस्थापकांनी सांगितले. कर्ज वाटप निर्धारित कालावधीत पूर्ण करुन लक्षांक गाठण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गट सचिवामुळे शेतकऱ्यांनी भरलेले कर्जाचा हप्ता बँकेकडे मिळाला नाही. अशा सर्व गटसचिवांची यादी तयार करा व त्यांच्यावर करावाई करा. गटसचिवामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत असेल तर त्यात शेतकऱ्यांची काय चुक आहे. अशा प्रकारची तक्रार येता कामा नये, असे ते म्हणाले. जिल्हयातील सर्व कामे सुरुळीत चालू राहील याची हमी दया.
जिल्हयातील आरोग्य यंत्रणा संथ झाली आहे. कोरोनाचे नाव सांगून रुग्णांना नागपूर येथे पाठविण्यास येते. वारंवार सूचना देऊनही गर्भवती महिलांना सुध्दा तालुका व जिल्हास्तरावर उपचार मिळत नाही, ही जिल्हयाची अवस्था असल्याचे श्री. म्हणाले. जिल्हा या सर्व त्रासदीपासून मुक्त कसा होईल याकडे प्रशासनाने गांर्भियाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यात लक्ष घालावे, असे ते म्हणाले.
शासन निर्णयानुसार जिल्हयात मका खरेदी केंद्र मंजूर आहे. तालुकास्तरावर लाखांदूर किंवा लाखनी येथे मका खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे. जेणे करुन मका उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हयातच मका खरेदी करता येईल, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. कृषी विभागाने अपूरी माहिती सादर करुन जिल्हयाचे मक्याचे उत्पन्न शुन्य दाखविण्याने असा प्रश्न निर्माण झाले असून प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून काम करा, असे ते म्हणाले.
जिल्हयात कुठेही पाणी टंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देतांनाच नादुरुस्त हातपंप दुरुस्त करा. नगर प्रशासनाच्या प्रलंबित प्रस्तावाचा पाठपूरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 8 मे पासून मनरेगात जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात कोणीही कामापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या. यावेळी कोरोनाबाबत आढावा घेण्यात आला असून जिल्हयात कोरोना प्रार्दुभाव कसा रोखता येईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Related Posts
-
अतिदुर्गम पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळ चे धान खरेदी केंद्र सुरू
प्रतिनिधी. गडचिरोली - तालुक्यातील पेंढरी व गट्टा बहुप्रलंबित धान खरेदी…
-
धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम लक्ष दया – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
प्रतिनिधी . भंडारा - पावसाळी परिस्थितीमुळे धान खरेदी केंद्रावरील धानाची…
-
विधानसभा अध्यक्षांकडून ऋतुजा रमेश लटके यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित…
-
धान कापणीच्या वेळी अवकाळी पावसाचा दणका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील रब्बी…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
कांदे खरेदी दर कमी केल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
आदिवासी समाज प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्षांचे राष्ट्रपतींना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - राज्यातील…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
नांदेड/प्रतिनिधी - देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
कोपर उड्डाणपूलाचे काम पुढील चार महिन्यात पूर्ण होणार
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर पुलाच्या कामाची…
-
नवीमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोरबे धरण पूर्ण भरले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
पंढरपुरात आंदोलनाची तयारी करा, बाळासाहेबांनी शासनाला दिला अखेरचा इशारा
मुंबई - राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले…
-
येत्या पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होणार - केडीएमसी आयुक्त
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा…
-
धुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा मागणीसाठी चक्काजाम
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - धुळे तालुक्यात…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
धान घोटाळा चौकशी प्रकरणी मुंबईचे पथक गोंदियात दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात…
-
रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदीची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - पणन हंगाम 2021-22 (रब्बी)…
-
अधिवेशन संपताच नाफेड मार्फत सुरु असलेली कांदा खरेदी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/-JanpCXO-kQ लासलगाव/प्रतिनिधी - लाल कांदा बाजारभाव…
-
रेल्वेरुळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याला भारतीय रेल्वेचे प्राधान्य
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वे लॉजिस्टिक…
-
वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या घेणार NRC कामगारांची भेट
कल्याण प्रतिनिधी - आंबिवली येथील NRC ही कंपनी गेल्या १२…
-
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या तारखेत बदल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने 215-…
-
वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन-2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व…
-
केडीएमसी निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढविण्याच्या तयारीत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी -सध्याची राजकिय परिस्थितीत पाहता…
-
आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासनाने आंतरराज्य बनावट औषध खरेदी व…
-
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने २१५-…
-
पारंपारिक फ्रीज असलेला माठ खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - उन्हाळा सुरू होताच…
-
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. बीड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी, सम्यक…
-
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष यांच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम खामगाव/प्रतिनिधी - राष्ट्रीय राजपूत करणी…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
नाफेडची कांदा खरेदी बंद केल्याने कांदा उत्पादकांची सरकार कडून फसवणूक - जयंत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - कांदा बाजार भाव प्रश्नी…
-
नेवासा येथे नव्याने उपविभागाची निर्मिती,तालुक्यातील कामे गतीने पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मृद व जलसंधारण विभागाच्या…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…
-
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न घेणारा शेतकरी ग्रासला…
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
काळा तलाव सुशोभीकरण डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण होणार - मंत्री कपिल पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत…
-
केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा हंसराज अहीर यांनी स्वीकारला पदभार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास…
-
पाणी बॉटल खरेदी करण्याच्या बहाण्याने आजीची चैन पळवणाऱ्या चोरट्याला अटक
कल्याण/प्रतिनिधी - चोरी करण्यासाठी चोरटे रोज नवनवीन युक्त्या लावतात.…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
पिस्तुलांचीची अवैध खरेदी करणारे दोघे गजाआड, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - अवैध शस्त्रांवर निर्बंध…
-
बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तांची खरेदी-विक्री करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/olUYwlk2ayA?si=5UYBEmLZUNaqzGS8 धुळे/प्रतिनिधी - बनावट कागदपत्रांच्या…
-
खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील…
-
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत, ६३.९५ टक्के झाले मतदान
नांदेड/प्रतिनिधी - 90-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी एकूण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण…
-
कल्याणात रोटरीच्या पूर्ण मॅरेथॉन मध्ये धावले २ हजारांहून अधिक स्पर्धक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - रोटरी क्लब ऑफ…
-
तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा पालकमंत्री ना. बच्चू कडू
प्रतिनिधी. अकोला -कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट या सारख्या शहरात…