संभाजी नगर/प्रतिनिधी -संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन हटाओ ही मागणी जोर धरू लागली आहे. ईव्हीएम मशीनमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत नाहीत असे सर्वच स्तरातून आरोप होत आहे. याच विषयाला धरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
आगामी निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कोणत्याही प्रगत देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, इव्हीएम मशिनद्वारे मुक्त व न्याय्य निवडणुका होऊ शकत नाहीत म्हणुन अमेरीका, इग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका होतात त्यामुळे ईव्हीएम हाटाओ देश बचाओ अशी भुमिका आंदोलकांची आहे. ईव्हीएम मुळे लोकशाही धोक्यात आली आहे असेही मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले.