नेशन न्युज मराठी टीम.
मुंबई– नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी आज निष्कासित करून पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. त्याठिकाणी नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले की, बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱ्या या चाळी आहेत. सुमारे शंभर वर्ष जुन्या या चाळीतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधायुक्त मोठे घर देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचे अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ बी निष्कासित करून प्रत्यक्षात साकारत आहे.आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या व राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाकरिता शासनाने म्हाडाची ‘सुकाणू अभिकरण’ (Nodal Agency) म्हणून नियुक्ती केली आहे, असेही डॉ.आव्हाड यांनी सांगितले.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॉट ब मधील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत असून उर्वरित प्लॉट अ मधील १९ चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा टप्पा क्रमांक १ अंतर्गत प्लॉट ब मधील २३ चाळींपैकी चाळ क्रमांक ५ बी, ८ बी व २२ बी मधील १७५ गाळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालय विभागास सेवानिवासस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवानिवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना नायगांव येथील बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामधील २२५ चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांचा ताबा म्हाडातर्फे देण्यात आला आहे.त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयाने येथील १७५ कर्मचाऱ्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून चाळ ५ बी, ८ बी व २२ बी रिक्त करून दिली आहे. निष्कासित रिक्त इमारती पाहून त्या ठिकाणी विक्री योग्य सदनिका (Saleble Component) बांधण्याचे प्रस्तावित आहे.
नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण ३ हजार ३४४ रहिवासी वास्तव्यास आहेत. या प्रकल्पाकरिता वास्तूशास्त्रज्ञ सल्लागार व प्रकल्पाचे समन्वयक म्हणून में संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रकल्पाचे कंत्राटदार म्हणून मे. एल. अॅण्ड.टी. कन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या प्रकल्पातील प्लॉट ब मधील सर्वेक्षणास स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे सर्वेक्षण होऊ शकले नाही. प्लॉट अ मधील चाळ क्रमांक १ अ, २ अ, १४ अ, १८ अ, १९ अ या ५ चाळीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लाभार्थ्याची अंतिम पात्रता यादी (३२५ पात्र) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्लॉट अ मधील चाळ क्रमांक १ अ. १८ अ, १९ अ मधील २२२ पात्र लाभार्थ्यांबाबत पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी गाळ्याचा क्रमांक संगणकीकृत आज्ञावलीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांची पात्रता अद्याप संचालक, बीडीडी यांच्याकडून निश्चित करण्यात आलेली नाही त्या लाभार्थ्यांच्या नावाऐवजी तात्पुरत्या स्वरूपात संचालक, बीडीडी यांच्या नावाची नोंदणी करून गाळेवाटप करण्यात आले आहे.या प्रकल्पामध्ये ३ बेसमेंट स्टील्ट २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामांच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी दिली आहे.
Related Posts
-
गोव्यात सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी - कोलंबो सुरक्षा परिषदेच्या अधिपत्याखाली …
-
4G सेवांच्या दहापट वेगवान असणाऱ्या 5G सेवांचा लवकरच प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…
-
बीडीडी चाळीतील मूळ सदनिकाधारकांना नाममात्र एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई/प्रतिनिधी - बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात…
-
शिवडी - न्हावा शेवा सी लिंक वरील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वी उभारणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – मुंबई शहराला नवी मुंबई…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
‘इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स इंधन वाहन’ च्या जगातील पहिल्या प्रोटोटाइपचे आज अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ऊर्जा…
-
आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
पर्यावरणाला अनुकूल, स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि…
-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी…
-
भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आम्ही जे करतो ते…
-
नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका
मुंबई/प्रतिनिधी - नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
मुंबईतील वरळी येथील १९५ बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास,२७ जुलै रोजी शुभारंभ
मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन…
-
‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात…
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
इंडियन ऑइलकडून सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या उड्डानासाठी इंधन पुरवठा
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इंडियन…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
पहिल्या महिला उपमहाराष्ट्र केसरीला चांदीची गदा,आ. राजू पाटील यांच्याकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे- राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
'सह्याद्री' युद्धनौकेचा, पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावामध्ये सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय…
-
समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शाळा सुरु होण्याच्या आधी…
-
हिरवा झेंडा दाखवत देशातील पहिल्या हरित हायड्रोजन इंधन सेल बसचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - देश…
-
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६०.२२ मतदानाची नोंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
आकासा एअरच्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - नागरी विमान वाहतूक…
-
पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये कल्याणच्या वैष्णवी पाटीलची धडक
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/ संघर्ष गांगुर्डे- कल्याण जवळील मंगरूळ…
-
लॉकडाऊन नंतर कल्याण आचार्य अत्रे रगंमंदिर मध्ये नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची दमदार सुरुवात
कल्याण - कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य…
-
यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर,इस्रो पहिल्या सूर्य मोहिमेसाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर,…
-
5G चा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने अर्ज मागवण्यासाठी दूरसंवाद विभागाकडून अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - देशाच्या सर्व नागरिकांना…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे…