नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहोचविण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, आदि उपस्थित होते.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ करिता एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश मंत्री श्रीमती गायकवाड यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता १ ली ते १२ वीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
पुणे येथील बालभारती भांडारात समग्र शिक्षा अभियान वितरणास राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे आदि उपस्थित होते.
Related Posts
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या…
-
महाराष्ट्रात इफको नॅनो युरियाचा वितरणाचा शुभारंभ
मालेगाव/प्रतिनिधी - सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून…
-
लाचखोरीच्या प्रकरणात माजी प्राप्तिकर अधिकाऱ्याला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - विशेष न्यायाधीश, सीबीआय प्रकरणे,…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास,धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा होणार -आरोग्यमंत्री
प्रतिनिधी . मुंबई - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात…
-
‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात…
-
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार, न्यालयाकडून आरोपीस २० वर्षाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/K5hZvX2sg00?si=U-AmE-Gv_t61GcCS बुलढाणा/प्रतिनिधी- मानसिक दृष्टया दिव्यांग असलेल्या…
-
महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वीजबिल कमी करण्याचे आमिष…
-
एचडीएफसी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी - लाचखोरी प्रकरणी दोषी ठरलेल्या…
-
चाकूने भोसकून पत्नीची हत्या करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुणावली जन्मठेपेची शिक्षा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - पती पत्नीच्या सुखी…
-
शालेय विद्यार्थी सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - प्रशांत उर्फ सनी…
-
अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,या मागणीसाठी नीळ वादळ रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - नांदेड येथील अक्षय भालेराव…
-
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त…
-
5G चा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने अर्ज मागवण्यासाठी दूरसंवाद विभागाकडून अधिसूचना जारी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - देशाच्या सर्व नागरिकांना…
-
4G सेवांच्या दहापट वेगवान असणाऱ्या 5G सेवांचा लवकरच प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी…