Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ

प्रतिनिधी.

सोलापूर – गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाली आहे.दि.25 जानेवारी रोजी प्राथमिक अवस्थेत ती मोहोळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.मोहोळ येथे कोरोना लसीकरणाचा प्रारंभ जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते झाला असून त्यांनी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात लस टोचून घेतली आहे.

मोहोळ शहर व ग्रामीण भागामध्ये कोविड लसीकरणाची सुरुवात दि.25 जानेवारी रोजी मोहोळ ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली आहे.मोहोळ तालुक्यात कोविडच्या लसीचे प्राथमिक अवस्थेतील 1435 लाभार्थी असून यामध्ये प्रथम 100 जणांना लस देण्यात येणार आहे.यामध्ये तालुक्यातील सर्व हेल्थ वर्कर, आशा वर्कर, आरोग्य सेविका,सेवक,सहाय्यका,डॉक्टर यांचा समावेश असणार आहे.तसेच मोहोळ मधील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक अशा सर्वांसाठी कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण पाथरूटकर यांनी दिली.

कोविड लसीचा प्रारंभ डॉ. समीर पटेल प्रा.आरोग्य केंद्र नरखेड,डॉ. सुहास कादे प्रा.आरोग्य केंद्र अनगर,डॉ.शैलेश झाडबुके,अध्यक्ष मेडिकल असोसिएशन, डॉ.जयंत गोळवलकर,मोहोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी मोहोळ ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता. तसेच मोहोळ तालुक्यातील अनगर,नरखेड, कामती बु,पाटकूल,शिरापूर,या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Translate »
X