नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरवले होते. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात आज (दि.4) राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. यात न्यायलयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नवनीत राणा रडलेल्या पाहायला मिळाल्या.
हायकोर्टाने नवीन राणांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यावर आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले “सध्या सर्वत्र तानाशाही सुरु आहे. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडला असता तर आम्हाला कीव आली असती, पण तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत आहात, हे दुर्दैवी गोष्ट आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या आधी त्यांचा निकाल येतो.एवढ्या वेळी कोर्ट कस काय चालते? त्यामुळे धर्म, जात सोडून ज्या लोकांना लोकशाही टिकावी असं वाटत असेल तर त्यांनी याचा विरोध केला पाहिजे”, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.
न्यायालयावरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास पायदळी तुडवला जात असेल, तर सगळं संपलं आहे.राणा हे हरलेल्या मानसिकेतून बोलत आहेत, त्यांची हार निश्चित आहे.राणा हे तिसऱ्या नंबर वरही राहणार नाही, नवनीत राणा ह्या 100% चौथा क्रमांक राहील” असे म्हणत बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला.
“हा निकाल दिल्यानंतर न्यायप्रिय लोक विचार करतील,108 पानाचा निर्णय हायकोर्टने दिल्यानंतर आता या कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यात आधीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागायच्या आधीच निकाल लागल्याचे सांगितलं.यावरून तानाशाही सुरू आहे हे समजतेय.काल मला चालता-चालता धमकीची चिट्ठी मिळाली,काही थोडे लोक राहणार आहेत विरोध करायला बाकी लोकच राहणार नाहीत विरोध करणारे.अतिशय वाईट अवस्था सुरू आहे देशाची” असे म्हणत बच्चू कडू यांनी आरोप केले.
एवढेच नाही तर बच्चू कडू यांनी रवी राणांवर देखील गंभीर आरोप केले. “आधी माफी पण मागितली नंतर भाऊ देखील म्हणाले,एवढे लाचार माणसं हिंदुस्थानात सापडणार नाही.त्यांनी तर दहा ठिकाणी सेटलमेंट केली आहे.रवी राणा यांनी आधी माफी मागितली होती, आम्हाला मोठा भाऊ म्हटल होतं, त्याच भावाला तुम्ही आता पैसे खाता अस म्हणता. सरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो, त्यामुळे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की, राणा जर आमच्यासोबत असं असेल, तर सामान्य लोकांसोबत कसं वागत असेल?