नवी दिल्ली/प्रतिनिधी – या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात देशातील एकूण कोळसा उत्पादनाने 448 दशलक्ष टनांचा टप्पा गाठला असून गेल्या वर्षी याच काळातील कोळसा उत्पादनाच्या तुलनेत यावर्षीच्या उत्पादनात 18%ची वाढ झाली आहे.
सीआयएल अर्थात भारतीय कोळसा उत्पादन कंपनीच्या कोळसा उत्पादनात देखील 17%हून अधिक वाढ झाल्याचे दिसते.देशातील कोळशावर आधारित उर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी नोव्हेंबर 2022 पर्यंत 30 दशलक्ष टन कोळसा साठवणुकीचे नियोजन केंद्रीय कोळसा मंत्रालयाने केले आहे. या नियोजनानुसार सातत्याने प्रयत्न सुरु ठेवून 31 मार्च 2023 पर्यंत देशातील औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये असलेला कोळसा साठा 45 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट मंत्रालयाने निश्चित केले आहे.
Related Posts