मुंबई/प्रतिनिधी – आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या ‘आशा’ धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दारदेखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या ‘आशा’ निवास धर्मशाळेच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती यांच्यासह नंदन निलकेणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, परमाणू ऊर्जा विभागाचे सचिव के एन व्यास, सहसचिव संजय कुमार, टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवे, यांच्यासह इन्फोसिस व टाटा मेमोरियल सेंटरचे इतर मान्यवर उपस्थित होते. खारघर येथे बांधण्यात आलेली ही १३ मजली अूसन इमारतीत २६० खोल्या आहेत.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, श्रीमती सुधा मूर्ती या महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील ‘आई’ आज आपल्याला पाहायला मिळाली, सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही, प्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं या स्थितीत श्रीमती मूर्ती यांची दातृत्वाची वृत्ती विरळी आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. जेव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेव्हा नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावनादेखील त्यांनी जपली.
आपण आज मंदिरे खुली केली आहेत पण यापूर्वीही डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपास, सोबत वावरत होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की उपचारासाठी मुंबईत किंवा मोठ्या शहरात कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडत नाही मग ते मिळेल तिथे राहतात, त्यांच्यासाठी हा ‘आशा’ निवास खूप महत्त्वाचा आधार ठरणार आहे. शासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत आहेच त्यात टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याच्या हाताने या कामाला अधिक बळकटी मिळते. मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येणारा रुग्ण खडखडीत बरा होऊन सुखरूप घरी जावो, अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली.
श्रीमती सुधा मुर्ती यांची पुस्तके ही केवळ चाळता येत नाहीत तर ती लक्ष देऊन वाचावी लागतात, यात कुठलाही कल्पनाविलास नाही तर अनुभवातून आलेला संदेश आणि विचार आहे, हे विचारधन तुम्ही वाटत आहात असेही मुख्यमंत्र्यांनी सुधा मुर्तींच्या पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले.
नवी मुंबई-खारघर येथे टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यात आलेल्या आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होईल असे सांगून श्रीमती मूर्ती यांनी टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचे कौतूक केले.इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचेही सांगितले.
Related Posts
-
मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर आणि रायपूरच्या वेदांत बाल्को मेडिकल सेंटर यांच्यात सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर…
-
बालाजी आंगन कॉम्प्लेक्समध्ये साकारलंय टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी…
-
इंडोनेशिया येथील कर्करोग रुग्ण नेव्हिगेटर्सना टाटा मेमोरिअल सेंटर करणार प्रशिक्षित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील टाटा मेमोरिअल केंद्राने…
-
दिड वर्ष कोविड रुग्णाची सेवा करून टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटर बंद
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
आशा वर्कर महिलांकडून हरियाणा घटनेचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - हरियाणा येथे…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती
पदाचे नाव : आशा स्वंयसेविका - ३६० जागा शैक्षणिक पात्रता : किमान…
-
केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप…
-
मंत्रालयात इट राईट अभियानाच्या फलकाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - सर्वांना सकस आणि निर्भेळ…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
विविध मागण्यांसाठी आशा वर्कर यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियानातील चार…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी ठरतोय डोकेदुखी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर आशा सेविकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रातील आशांच्या शासनाकडे प्रलंबित…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे…
-
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये इंडियन ऑटो शो
मुंबई प्रतिनिधी - पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
सरकार विरोधात आशा गटप्रवर्तक संघटनेचे जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील आशा…
-
दिवाळी पूर्वी आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
टाटा ग्रुपने जपला सामाजिक बंधिलकीचा वसा कोरोनासाठी १५०० कोटीची मदत.
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना हे आता पर्येंतचे देशापुढील सर्वात मोठे…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या…
-
वंचित बहुजन आघाडीचा महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
भिवंडी येथील वलपाडा परिसरात कोसळली इमारत,अनेक लोक ढिगाऱ्याखाली
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी येथील वलपाडा परिसरातील…
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या…
-
सांगलीत लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी -आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या…
-
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
प्रतिनिधी. पुणे - कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक…
-
आता दिल्ली छावणी क्षेत्रात टाटा पॉवरचे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराने आपल्या 'गो-ग्रीन…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…
-
ऑनलाइनचे सक्तीने काम देणे बंद करावे मागणीसाठी आशा सेविका आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - दबाव तंत्राने करुन घेतले…